नागपूर :- जागनाथ बुधवारी येथील महायोगी गोरखनाथ मंदिर आणि लकडगंजमधील विमलेश्वरनाथ मंदिराच्या जागा व विकासाच्या प्रश्नावर जनजागृती करण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रिय नाथजोगी समाजसुधार संस्था तथा गोरखनाथ मंदिर सेवा समितीने रविवार, २२ नोव्हेंबर रोजी गोरखनाथ प्रकटदिनानिमित्त जास्तीत जास्त भक्तांनी मंदिरात उपस्थित राहावे, असे आवाहन केले आहे. १३ ऑक्टोबर रोजी झालेल्या पत्रकार परिषदेत संस्थेने मंदिरांच्या जागा, अतिक्रमण आणि विकासाचे मुद्दे प्रशासनासमोर मांडले होते. मंदिराची परिस्थिती पाहून या भूमिकेवर काही भक्तांनी ठाकरे यांची नाराजी व्यक्त केली असली तरी कोणाच्याही भावना दुखावण्याचा संस्थेचा हेतू नसल्याचे स्पष्ट करण्यात आले. मंदिरांचे अस्तित्व टिकावे, अतिक्रमणाची निष्पक्ष चौकशी व्हावी आणि मंदिरांचा विकास व्हावा, हीच संस्थेची भूमिका आहे. त्यामुळे भक्तांनी वाद किंवा उद्रेक न करता शांततेच्या आणि कायदेशीर मार्गाने मंदिरांच्या संरक्षणासाठी एकत्र यावे, असे आवाहन संस्थेने केले आहे. पत्रकार परिषदेला उपस्थित मंचावरील शंकरनाथ जाधव, रणजीत राऊत, मनीष पुंड, मनोहर माळवे, सारंग साकरे यांची उपस्थिती होती.
Latest News
Related Posts
गोरखनाथ मंदिराच्या संरक्षणासाठी भक्तांना एकत्र येण्याचे आवाहन






