नागपूर :- सन 1874 मध्ये स्थापन झालेल्या श्री सुब्रमण्यम देवस्थान (श्री गणेश कार्तिक मंदिर) यांच्या वतीने भगवान श्री सुब्रमण्यम स्वामी आणि त्यांच्या दिव्य पत्नी देवी वल्ली व देवी देवयानी यांच्या पवित्र विवाह सोहळ्याचे श्री सुब्रमण्यम स्वामी कल्याणम् भव्य आयोजन संगम मंदिर, राणी झाशी चौक, सीताबर्डी, नागपूर येथे करण्यात आले आहे.या धार्मिक सोहळ्याचा शुभारंभ रविवार, 22 नोव्हेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता. भव्य शोभायात्रेने होणार आहे. ही शोभायात्रा भगवती मंदिर, यशवंत स्टेडियम येथून प्रारंभ होऊन संगम मंदिर येथे पोहोचेल. त्यानंतर प्रसाद वितरण करण्यात येईल.
मुख्य धार्मिक कार्यक्रम श्री सुब्रमण्यम स्वामी कल्याणम् सोमवार, 23 नोव्हेंबर 2026 रोजी संगम मंदिर येथे संपन्न होईल. विवाहाचा शुभ मुहूर्त सकाळी 9:45 ते 10:20 या वेळेत आहे.त्यानंतर सकाळी 11:00 ते सायंकाळी 4:00 वाजेपर्यंत महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.यावेळी अन्य धार्मिक कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात आले आहे.
– श्री कार्तिक स्वामी दर्शनम्: सोमवार, 23 नोव्हेंबर रोजी रात्री 11:42 वाजल्यापासून मंगळवार, 24 नोव्हेंबर 2026 रोजी रात्री 8:23 वाजेपर्यंत.
– अन्नामलाई दीपम्: मंगळवार, 24 नोव्हेंबर 2026 रोजी सायंकाळी 7:00 ते रात्री 8:30 वाजेपर्यंत. त्यानंतर प्रसाद वितरण करण्यात येईल.
या पवित्र धार्मिक सोहळ्याच्या निमित्ताने भाविकांना या दिव्य उत्सवात सहभागी होऊन भगवान श्री सुब्रमण्यम स्वामी, देवी वल्ली आणि देवी देवयानी यांचे आशीर्वाद प्राप्त करण्याची संधी लाभणार आहे.
देवस्थान व्यवस्थापनाच्या वतीने सर्व भाविक, धर्मप्रेमी नागरिक आणि हितचिंतकांना आपल्या कुटुंबीयांसह या पवित्र सोहळ्यात सहभागी होऊन कार्यक्रमाची शोभा वाढवावी व सोहळा यशस्वी करण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात येत आहे






