spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

कॅन्सर डायग्नोसीस व्हॅनचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते आज व्हॅनचे उद्घाटन..

यवतमाळ, दि. 11 (जिमाका) : राष्ट्रीय असंसर्गजन्यरोग नियंत्रण कार्यक्रम राज्यात राबविण्यात येत आहे. या कार्यक्रमांतर्गत उच्च रक्तदाब, मधुमेह, मुख कर्करोग, स्तन कर्करोग, गर्भाशयमुख कर्करोग, स्ट्रोक, हृदयरोग इत्यादी आजारांची सर्व आरोग्य संस्थांमध्ये तपासणी, उपचार व निदान केल्या जाते. कार्यक्रमांतर्गत दि.30 जूनपर्यंत विशेष तपासणी मोहिम राबविण्यात येत आहे. मोहिमेंतर्गत संशयित कॅन्सर रुग्णांवर मोफत निदान व उपचारासाठी तपासणी व्हॅन जिल्ह्यात येणार आहे. या व्हॅनचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

राष्ट्रीय असंसर्गजन्यरोग नियंत्रण कार्यक्रम जिल्ह्यात सर्व आरोग्य संस्थांमध्ये सन 2018 पासून राबविण्यात येतो. कार्यक्रमांतर्गत वर्षभर विविध आरोग्य दिवस साजरे केले जातात. जागतिक कर्करोग दिन, जागतिक कर्करोग दिन हा दरवर्षी 4 फेब्रुवारी रोजी साजरा करण्यात येतो. त्यानुसार यावर्षी देखील जिल्हा महिला व बाल रुग्णालयात जनजागृतीपर कार्यक्रम घेवून दिवस साजरा करण्यात आला.

जिल्ह्यात दि.30 जून सर्व उपजिल्हा, ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र, नागरी आरोग्य केंद्र, नागरी आरोग्य उपकेंद्र, आपला दवाखाना या ठिकाणी मुख कर्करोग, स्तन कर्करोग व गर्भाशयमुख कर्करोग या तीन कर्करोगासंबंधी विशेष तपासणी मोहीम राबविण्यात येत आहे. सदर मोहिमेंतर्गत या तीन कर्करोगासंबंधीत आढळुन आलेल्या संशयित रुग्णांवर मोफत निदान व उपचार करण्याकरीता जिल्ह्यात प्रथमच कॅन्सर डायग्नोसीस व्हॅनचे आगमन होणार आहे.

कॅन्सर डायग्नोसीस व्हॅनमध्ये तपासणी दरम्यान आढळुन येणाऱ्या मुख कर्करोग, स्तन कर्करोग व गर्भाशयमुख कर्करोगाच्या संशयित रुग्णांची बायोप्सी करण्यात येणार आहे. दि.12 जून रोजी जिल्हा शल्य चिकित्सक व जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या समन्वयाने जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून कॅन्सर डायग्नोसीस व्हॅनचे उद्घाटन करण्यात येणार आहे. व्हॅन ही सर्व उपजिल्हा व ग्रामीण रुग्णालय तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र येथे महिनाभर फिरणार आहे. मुख कर्करोग, स्तन कर्करोग, गर्भाशयमुख कर्करोग संबंधी लक्षणे निदर्शनास येणाऱ्या व्यक्तींनी व्हॅनचा लाभ घ्यावे, असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सकांनी केले आहे.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.