spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

मनपाची ज्ञानयोगी डॉ. श्रीकांत जिचकार ई-लायब्ररी स्पर्धा परीक्षार्थींसाठी वरदान..

विद्यार्थी व स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांना नि:शुल्क सुविधा

नागपूर, ता. १०  : नागपूर महानगरपालिकेच्या पाच वर्षांपूर्वी सुरू झालेल्या जयताळा येथील ज्ञानयोगी डॉ. श्रीकांत जिचकार ई-लायब्ररीचा लाभ घेऊन अभ्यास करणारे अनेक विद्यार्थी व स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे अनेक जण शासकीय सेवेत दाखल झाले आहेत. शहराच्या एका टोकाला असलेली ही ई-लायब्ररी आर्थिकदृष्या दुर्बल घटकातील विद्यार्थी व स्पर्धा परीक्षांची तयारी करणार्या विद्यार्थ्यांसाठी आशेचा किरण ठरत आहे.मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी मार्गदर्शनानुसार, अतिरिक्त आयुक्त श्रीमती वैष्णवी बी. यांच्या नेतृत्त्वात आणि शिक्षणाधिकारी श्रीमती साधना सयाम यांच्या मार्गदर्शनाखाली महानगरपालिकेचे ग्रंथालये अधिकाधिक अभ्यास केंद्र म्हणून विकसित करण्यात येत आहे.

महानगरपालिकेतर्फे जयताळा येथे सुरुवातीला नागरिकांसाठी वृत्तपत्र वाचन करण्याकरिता फक्त अध्ययन कक्ष चालविला जात होते. या भागातील विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यासाठी खासगी वाचनालायाशिवाय पर्याय नव्हता. त्यामुळे दरमहिन्यात शुल्क देणे विद्यार्थ्यांना परवडत नव्हते. महानगरपालिकेने सन  2019 पासून अध्ययन कक्षाचे स्वरुप ई-लायब्ररीत बदलविण्यात आले.  सन 2021 पासून विद्यार्थ्यांना अध्ययन कक्षातील वृत्तपत्र वाचनाशिवाय ई-लायब्ररीत अभ्यास करण्याची संधी मिळू लागली आहे. या ई-लायब्ररीत अभ्यास करणासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांपुढे  ज्ञानयोगी डॉ. श्रीकांत जिचकार यांचा आदर्श असावा, अभ्यास करणारा विद्यार्थी हा डॉक्टर, इंजिनियर, सीए असा उच्चविद्याविभूषित व्हावा,  आयएएस,आयपीएस  या सारख्या मोठया परीक्षा उत्तीर्ण कराव्यात, बॅक, रेल्वे  व इतर सरकारी पदावर त्यांची निवड व्हावी,  विद्यार्थ्यांनी डॉ. श्रीकांत जिचकार यांच्या सारखे मोठे यश मिळावावे याकरीता या लायब्ररीला   ज्ञानयोगी डॉ. श्रीकांत जिचकार ई-लायब्ररी नाव देऊन एक मोठा आदर्श विद्यार्थ्यांसमोर ठेवण्यात आला आहे. बँक व पोलीस भरतीच्या स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा सर्वाधिक कल या लायब्ररीकडे आहे.या ई-लायब्ररीची सभासद संख्या ही 910 आहे.  महानगरपालिकेतर्फे मान्यता प्राप्त असलेल्या भारतीय शिक्षण संस्था, जयताळा नागपूर या स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून परिसरातील नागरिकांसाठी अध्ययन कक्ष बरोबर विद्यार्थ्यांकरीता ई-लायब्ररी चालविली जात आहे. मनपाच्या नियमानुसार सकाळी 8 ते रात्री 8 वाजेपर्यंत ही लायब्ररी चालविली जाते.

विविध स्पर्धा परीक्षा, एमपीएससी, यूपीएससीच्या विविध परीक्षेची तयारी करताना विद्यार्थ्यांना कुठलीही अडचणी येऊ नये याकरीता विद्यार्थ्यांशी संवाद साधून विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार संदर्भ साहित्य, पुस्तके आणले जाते. तर परीक्षेंच्या काळात विद्यार्थ्यांचे भवितव्य लक्षात घेऊन अभ्यासिकेची वेळ सुद्धा रात्री दहा वाजेपर्यंत वाढविली जाते.लायब्ररीत मुला-मुलींच्या अभ्यासासाठी चांगले टेबल खुर्च्या इत्यादीची सोय करण्यात आली आहे. स्पर्धा परीक्षेची तयारी करणार्या विद्यार्थ्यांकरीता नि:शुल्क अभ्यासिका, नि:शुल्क कंप्यूटर व इंटरनेट सुविधा, एअर कंडिशनर रुम, भोजनासाठी वेगळे टेबल, पिण्याच्या पाण्याची सुविधा दिली जात आहे. त्यामुळे एकाच दिवशी 250 च्यावर विद्यार्थ्यांना अभ्यासाची सुविधा उपलब्ध होत असल्याची माहिती भारतीय शिक्षण संस्थांचे संचालक ज्ञानेश्वर चौधरी यांनी माहिती दिली.जिल्हयातील विविध ग्रामीण भागातील आणि चंद्रपूर, वर्धा, गडचिरोली, भंडारा, गोंदिया सारख्या जिल्ह्यातील विद्यार्थी या लायब्ररीचा लाभ घेत आहेत. दरवर्षी वेगवेगळ्या पदावर नोकरी मिळविलेल्या उमेदवारांचा सत्कार, त्यांचे कौतुक आणि त्यांचे अनुभवकथनाचे कार्यक्रम  आयोजित केले जात असल्यामुळे इतर विद्यार्थ्यांना सुद्धा यश मिळविण्याकरीता प्रेरणा मिळत आहे.  विद्यार्थ्यांची वाढती संख्या लक्षात घेता काही खोल्यात अभ्यासिकेची सुविधा सुद्धा वाढविली जाणार आहे अशी माहिती भारतीय शिक्षण संस्थांचे संचालक श्री. ज्ञानेश्वर चौधरी यांनी दिली.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.