spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

भाजप व काँग्रेस पक्षाकडून महापौर व उपमहापौरपदाच्या उमेदवारांचे अर्ज दाखल

नागपूर :- नागपूर महानगरपालिकेच्या महापौरपदासाठी भाजपने नगरसेविका नीता ठाकरे यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला तर काँग्रेसकडून नगरसेविका स्नेहल ठाकरे यांचा उमेदवारी अर्ज आज (ता. 2) दाखल केला. त्याचप्रमाणे उपमहापौरपदासाठी भाजपच्या उमेदवार नगरसेविका लीला हाथीबेड तर काँग्रेसकडून यापदासाठी नगरसेवक विवेक निकोसे यांनी अर्ज दाखल केला. नागपूर महानगरपालिकेच्या महापौर व उपमहापौरपदासाठी निवडणूक येत्या 6 फेब्रुवारी रोजी कविवर्य सुरेश भट सभागृहात सकाळी 11 वाजता होणार आहे. या प्रसंगी पीठासीन अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर उपस्थित राहणार आहेत.

नागपूर महानगरपालिकेच्या निगम सचिव डॉ. रंजना लाडे यांच्याकडे दोन्ही पक्षांच्या उमेदवारांनी डॉ. पंजाबराव देशमुख स्थायी समितीच्या सभागृहात अर्ज दाखल केले. याप्रसंगी सचिवालय विभागाचे अधीक्षक ताराचंद खंडाते, वरिष्ठ लिपिक राजेश जामनकर, राजस्व निरिक्षक विलास धुर्वे, भूषण शे‍लार, मनोज जोशी, मृणाल बागडे, हीना बोरकर उपस्थित होते.

भाजपच्या महापौरपदाच्या उमेदवार नगरसेविका (प्रभाग क्र. 28 क) नीता ठाकरे यांनी दोन प्रतींमध्ये अर्ज दाखल केले असून, सूचक म्हणून नरेंद्र (बाल्या) बोरकर व माया इवनाते आहेत तर या अर्जांवर अनुमोदक म्हणून नगरसेविका अश्विनी जिचकार व निरंजना पाटील यांच्या स्वाक्षरी आहेत.

त्याचप्रमाणे भाजपच्या उपमहापौरपदाच्या उमेदवार नगरसेविका (प्रभाग क्र. 29 क) लीला हाथीबेड यांनीही दोन उमेदवारी अर्ज दाखल केले असून, यावर सूचक म्हणून नगरसेविका मंगला खेकरे व नगरसेवक विनोद कन्हेरे यांच्या स्वाक्षरी आहेत, तर अनुमोदक म्हणून नगरसेवक कल्पक भनारकर व नगरसेविका मनीषा अतकरे यांच्या स्वाक्षरी आहेत.

यावेळी भाजपचे शहर अध्यक्ष व माजी महापौर दयाशंकर तिवारी, आमदार कृष्णा खोपडे, आमदार मोहन मते, माजी आमदार अनिल सोले, माजी आमदार गिरीश व्यास, भाजपचे गटनेते नरेंद्र (बाल्या) बोरकर यांच्यासह अनेक नवनिर्वाचित नगरसेवक उपस्थित होते.

काँग्रसेसकडून स्नेहल ठाकरे

काँग्रेसकडून महापौरपदाच्या उमेदवार म्हणून नगरसेविका (प्रभाग क्र. 11 ब) स्नेहल ठाकरे यांनी निगम सचिव डॉ. रंजना लाडे यांच्याकडे दाखल केला. या अर्जावर सूचक म्हणून नगरसेविका सरस्वती सलामे तर अनुमोदक म्हणून नगरसेविका मंजु चाचेरकर यांची स्वाक्षरी आहे. उपमहापौरपदाच्या निवडणुकीसाठी काँग्रेसचे उमेदवार म्हणून नगरसेवक (प्रभाग क्र. 9 अ) विवेक निकोसे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यांच्या अर्जावर सूचक म्हणून नगरसेवक प्रमोद जोगिंदर सिंग ठाकूर तर अनुमोदक म्हणून नगरसेविका प्रगती यादव यांच्या स्वाक्षरी आहे. यावेळी काँग्रेसचे गटनेते नगरसेवक संजय महाकाळकर, नगरसेविका सरस्वती सलामे, नगरसेविका मंजु चाचेरकर, नगरसेवक प्रमोद जोगिंदर सिंह ठाकूर उपस्थित होते.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.