spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

पिपळा, कान्होलीबारा, भिलगाव, कळमना येथे नवीन पोलीस ठाण्यांना मंजुरी

नागपूर ८ : नागपूर शहरातील हुडकेश्वर, कळमना, हिंगणा व यशोधरानगर ठाण्यांचे विभाजन करून पिपळा, कान्होलीबारा, भिलगाव व कळमना गाव येथे नवीन पोलिस ठाण्यांना मंजुरी मिळाली आहे. या चार ठाण्यांसाठी एकूण २६९ पदांना गृहविभागाने मंजुरी दिली आहे.नागपूर : शहरातील चार ठाण्यांचे विभाजन करून त्यातून चार नवीन पोलिस ठाण्यांना गृहविभागाने मंजुरी दिली आहे. या ठाण्यांसाठी विभागाकडून २६९ पदे मंजूर करण्यात आली असून त्यात पिपळा, कान्होलीबारा, भिलगाव आणि कळमना गाव या ठाण्यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे नवीन ठाणे तयार करताना, हुडकेश्वर, कळमना, हिंगणा व यशोधरानगर पोलिस ठाण्यांचे विभाजनही करण्यात आले आहे.
शहरात चार नवीन ठाणे आणि सहावे परिमंडळ प्रस्तावित होते. काही दिवसांपूर्वी परिमंडळ सहाला मंजुरी देत, पदांनाही मंजुरी देण्यात आली होती. आता चार नवीन पोलिस ठाण्यांना मंजुरी दिली आहे.
त्यात कळमना पोलिस ठाण्याचे विभाजन करून कळमना गाव, हिंगण्यातील कान्होलीबारा, यशोधरानगरमधील भिलगाव तर हुडकेश्वर पोलिस ठाण्याचे विभाजन करून पिपळा असे नवीन पोलिस ठाणे तयार करण्यात आलेली आहेत. चारही ठाण्यांसाठी १५ कोटी ७७ लाख ४१ हजार ८८४ रुपयांचा निधी गृहविभागाने मंजूर केला आहे. याशिवाय ठाण्यानुसार पदांची संख्याही मंजूर केली आहे. त्यामुळे नागपूर शहरात ठाण्यांची संख्या ३५ वरून ३९ झाली आहे.अशी आहे पदसंख्या…
पिपळा पोलिस ठाण्यात पोलिस निरीक्षक, दोन सहाय्यक निरीक्षक, तीन उपनिरीक्षक, सात सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक, २० हेडकॉन्स्टेबल व ३२ पोलिस कर्मचाऱ्यांसह ६५ कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

कळमना गाव पोलिस ठाण्यात एक पोलिस निरीक्षक, दोन सहाय्यक निरीक्षक, पाच उपनिरीक्षक, आठ सहाय्यक उपनिरीक्षक, २१ हेडकॉन्स्टेबल व ३६ कर्मचारी (एकूण ७३), कान्होलीबारामध्ये पोलिस निरीक्षक, तीन सहाय्यक निरीक्षक, पाच उपनिरीक्षक सात सहाय्यक उपनिरीक्षक, १५ हेडकॉन्स्टेबल, ३४ पोलिस कर्मचारी (एकूण ६५) असतील. भिलगाव पोलिस ठाण्यात निरीक्षक, दोन सहाय्यक निरीक्षक, आठ उपनिरीक्षक, पाच सहाय्यक उपनिरीक्षक, १५ हेडकॉन्स्टेबल व ३५ पोलिस शिपायांची नियुक्ती (एकूण ६६) करण्यात येणार आहे.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.