spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

उरलेल्या मटणावरून वाद; मोठ्या भावाने केली लहान भावाची हत्या

चंद्रपूर :- चंद्रपूरच्या चिमूर तालुक्यातून एक अतिशय खळबळजनक बातमी समोर आली आहे. मटणाच्या भाजीवरून झालेल्या वादात मोठ्या भावाने लहान भावावर कुऱ्हाडीने घाव घालत खून केल्याची घटना घडली आहे. चिमूर तालुक्यातील शंकरपूर येथील काल (2 सप्टेंबर) संध्याकाळच्या सुमारास ही घटना घडली आहे. बहिणीला दिलेल्या पाहुणचाराच्या मटणाच्या भाजीवरून उफाळलेला किरकोळ वादातून ही घटना झाल्याची माहिती चंद्रपूर पोलिसांनी दिली आहे. भावंडातील किरकोळ वादातून रक्तरंजित राड्यात परावर्तित झालेल्या या घटनेनं संपूर्ण जिल्हा हादरला असून परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रमेश श्रीराम बनकर (वय 55) असे मृत भावाचे नाव असून हत्या करणारा मोठा भाऊ जगन श्रीराम बनकर (वय 60) याला भिसी पोलिसांनी अटक केली आहे. रक्षाबंधनानिमित्त बहीण घरी आल्याने तिच्या स्वागतासाठी मटणाचा बेत आखण्यात आला होता. बहीण राखी बांधून परतल्यानंतर सायंकाळच्या सुमारास उरलेल्या मटणाच्या भाजीवरून जगन आणि रमेश यांच्यात वादाची ठिणगी पडली. दोघेही दारूच्या नशेत धुंद असल्याने वाद विकोपाला गेला. रागाच्या भरात सनकी जगनने घरात असलेली कुऱ्हाड उपसली आणि रमेश यांच्या मानेवर व डोक्यावर प्राणघातक प्रहार केले. कुऱ्हाडीचे खोल वार बसल्याने रमेश रक्ताच्या थारोळ्यात कोसळले आणि त्यांचा जागीच दुर्दैवी अंत झाला. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत रक्ताने माखलेला मृतदेह ताब्यात घेतला. आरोपी जगन बनकर याला भिसी पोलिसांनी अटक केली आहे.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.