किशोर साहू, मौदा :- सोमवार (ता. 20 जुलै)ला दुपारी सव्वातीन ते सव्वाचार दरम्यान एक तास कोदामेंढी, तारसा रेल्वे (निमखेडा) परिसरासह मौदा तालुक्यात यंदाच्या प्रथमच धुवाधार पाऊस झाला. या धुवाधार पावसामुळे शेतात काम करणारे महिला मजूरवर्ग मिरचीचे रोपे लावण्याचे कामे अर्ध्यातच सोडून, शेतात पाणी साचल्याने वेळेपूर्वीच घरी येताना दिसले.

शाळेच्या सुट्टीपर्यंत पाऊस सुरूच असल्याने विद्यार्थीही ओले होत घरी जाताना दिसले. या पावसामुळे धान रोवणीच्या कामाला वेग येणार असून शेतकरी व मजूर वर्गात आनंदाचे वातावरण दिसले.



