किशोर साहू, मौदा ,ता. २०:- समाजाची नि:स्वार्थ भावनेने आणि निष्ठेने सेवा करणाऱ्या व शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्या शिक्षकांना त्यांच्या अंगीकृत कामात प्रोत्साहन देण्याच्या व त्यांच्या गुणांचा यथोचित सन्मान करण्याचे उद्देशाने राज्य स्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर करण्यात येतो.
सन 2024-25 च्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले राज्यशिक्षक गुणगौरव पुरस्कार साठी महाराष्ट्र राज्यातून 109 शिक्षकांची निवड झाली त्यामध्ये माध्यमिक शिक्षक गटात नागपूर जिल्ह्यातून एकमेव श्री साईबाबा विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय निमखेडा चे विज्ञान शिक्षक आशिष शामराव आरीकर यांची आदर्श शिक्षक गुणगौरव पुरस्कार साठी निवड झाली आहे .याआधीही आशिष आरीकर यांना तालुका, जिल्हा व राज्यस्तरावर होणाऱ्या विज्ञान मेळाव्यात अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत तसेच आशिष आरीकर यांच्या मार्गदर्शनात आदित्य शिंगणे या विद्यार्थ्याला राष्ट्रीय स्तरावरील इन्स्पायर अवॉर्ड राष्ट्रपती द्रोपदी मुरमु आणि मानव संशोधन विकास मंत्री भारत सरकार यांच्या हस्ते देण्यात आला आहे.
आशिष आरीकर यांची राज्यस्तरीय शिक्षक गुणगौरव पुरस्कार साठी निवड झाल्याने त्यांचे शाळेचे माजी मुख्याध्यापक यशवंत डोंगरे, नंदकुमार सरोदे, प्रकाश टिपरे निस्पृह शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष सुरेंद्र हटेवार, सचिव अखाडनाथ नानोटकर ,मुख्याध्यापक आकाश निनावे, शिक्षकवृंद राजेंद्र भुजाडे, ईश्वर पत्रे, रवींद्र गोयले, महेश तिजारे, मंगेश बोरकर, मोहीब सय्यद, उमेश वैद्य, हेमलता मरसकोल्हे, ज्योती गजभिये, शुभम झाडे, आकाश बोंद्रे, अविनाश राऊत शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच परिसरातील नागरिक यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.




