पांढरकवडा :- नगर परिषद निवडणूक अवघ्या काही दिवसा आगोदर निवडणूक पार पडुन निकाल जाहीर झाले यात भारतीय जनता पक्षाचे नगराध्यक्षसह ६ उमेदवार विजयी झाले, तसेच शिवसेना शिंदे गटाचे तथा खेताणी फाऊंडेशनचे १६ उमेदवारांनी बहुताने विजय मिळवला शिवसेना शिंदे गटाचे शिवसेना शहरप्रमुख तथा नगरसेवक आतीष तानाजी चव्हाण यांची नगर परिषद गटनेते पदि निवड करण्यात आली. ही निवड जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड, खेताणी फाऊंडेशनचे प्रमुख सलीम खेताणी यांच्या आदेशानुसार शिवसेना जिल्हाप्रमुख राजुदास जाधव यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे पत्र दिले या निवडीमुळे शिवसेना शिंदे गट व खेताणी फाऊंडेशन मध्ये उत्साहाचे वातावरण दिसत आहे. गटनेते पदी निवड झालेल्या आतीष चव्हाण हे नेहमी गोर गरीबांच्या संपर्कात राहुन लोकांचे काम करणारे युवा वर्गात चांगली पकड असलेल्या युवा नेतृत्वाचे गटनेते पदी निवड झाल्याने नागरिकांकडून पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा देत त्यांचे कौतुक केले जात आहे.




