spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

52 व्या ‘ग्रंथभेट’ योजनेसाठी ग्रंथ पाठविण्याचे लेखक व प्रकाशकांना आवाहन

नागपूर :- राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठाण कोलकाता व राज्यशासनाच्या ग्रंथालय संचालनालयाच्या सयुक्त विद्यमाने समान निधी ‘ग्रंथभेट’ योजनेअंतर्गत वर्ष 2025 मध्ये प्रकाशित झालेल्या मराठी, हिंदी व इंग्रजी भाषेतील प्रथम आवृत्ती ग्रंथांची प्रत्येकी एक विनामूल्य प्रत 28 फेब्रुवारी 2026 पर्यंत पाठविण्याचे आवाहन, नागपूर शासकीय विभागीय ग्रंथालयाचे प्रभारी ग्रंथपाल रामदास साठे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे .

‘ग्रंथभेट योजनेंतर्गत खरेदी करण्यात येणाऱ्या ग्रंथाची निवड करण्यासाठी तसेच ग्रंथालय संचालनालय स्तरावरून प्रसिद्ध होणाऱ्या शासनमान्य ग्रंथ निवड यादीमध्ये समावेश होण्याच्यादृष्टीने 1 जानेवारी ते 31 डिसेंबर 2025 दरम्यान प्रकाशित झालेल्या व प्रथम आवृत्ती असलेल्या ग्रंथांची प्रत्येकी एक विनामूल्य प्रत ही ग्रंथालय संचालक, ग्रंथालय संचालनालय महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्याकडे 28 जानेवारी 2026 पर्यंत सादर करणे आवश्यक आहे. यानंतर पाठविण्यात येणाऱ्या ग्रंथांचा निवड यादीसाठी विचार केला जाणार नाही,असेही नमूद करण्यात आले आहे.

या योजनेसाठी वर्ष 2025 मध्ये प्रकाशित झालेले ग्रंथ जर यापुर्वी संचालनालयास पाठविले असल्यास पुन्हा ग्रंथ पाठविण्याची आवश्यकता नसल्याचे संचालनालयाने कळविले आहे. मुद्रण व नोंदणी अधिनियम,1867 आणि ग्रंथ प्रदान अधिनियम 1954नुसार प्रकाशकाने या योजनेसाठी पाठवायच्या ग्रंथाची प्रत्येकी एक प्रत राज्य मध्यवर्ती ग्रंथालय नगरभवन मुंबई, शासकीय विभागीय ग्रंथालय पुणे व शासकीय विभागीय ग्रंथालय नागपूर येथे पाठविणे आवश्यक आहे. ग्रंथ पोहचल्याची पोच पावती घेवून ग्रंथालय संचालनालयाकडे पाठविण्यात येणाऱ्या ग्रंथासोबत ही पोचपावती टपालामार्फत किंवा समक्ष पाठविण्यात यावी असेही सांगण्यात आाले आहे.

Popular Articles