spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यावर यवतमाळमध्ये जागृती शिबीर संपन्न

यवतमाळ :- आंतरराष्ट्रीय बालिका दिनाचे औचित्य साधून, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, यवतमाळ व पिपल्स माध्यमिक विद्यालय, यवतमाळ यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक ८ ऑक्टोबर २०२५ रोजी “बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा, २०१२” व “नालसा मुलांसाठी बाल अनुकूल कायदेशीर सेवा योजना २०२४” या विषयावर कायदेविषयक शिबिराचे आयोजन करण्यात आले.

हा कार्यक्रम नागेश वि. न्हावकर, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा अध्यक्ष, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच सचिव दीपक दाभाडे यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पिपल्स विद्यालयाचे संतोष गुजर होते. प्रमुख वक्ते म्हणून प्रीती पी. पोरटकर (पॅनल वकील) आणि माधुरी कोटेवार (जिल्हा समुपदेशक, ग्रामिण समस्या मुक्ती ट्रस्ट) उपस्थित होत्या.

कोटेवार यांनी चांगला व वाईट स्पर्श, सोशल मिडियाद्वारे होणारी फसवणूक, आणि बालकांच्या सुरक्षिततेविषयी उपयुक्त माहिती दिली. त्यांनी विद्यार्थ्यांना कोणत्याही अनुचित प्रकारांबाबत तात्काळ शिक्षक, पालक किंवा संबंधित अधिकाऱ्यांना कळविण्याचे महत्त्व स्पष्ट केले.

पोरटकर यांनी बाल लैंगिक अत्याचार कायद्यासह विविध तक्रार नोंदविण्याच्या यंत्रणा, हेल्पलाइन क्रमांक, व समुपदेशनाच्या पद्धती यावर सखोल मार्गदर्शन केले. मुलींनी सामाजिक व्यवहारात सावधगिरी बाळगणे, चांगल्या सवयी आत्मसात करणे यावरही त्यांनी भर दिला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सोनाली मैत्र यांनी केले, तर आभारप्रदर्शन ज्युली खडसे यांनी केले. शिबीराला शाळेतील विद्यार्थिनी व शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.