Home Latest News ‘पौर्णिमा दिनानिमित्त आग्याराम देवी चौक येथे जनजागृती

‘पौर्णिमा दिनानिमित्त आग्याराम देवी चौक येथे जनजागृती

0
34

नागपूर :- नागपूर महानगरपालिका आणि ग्रीन व्हिजिल फाउंडेशनच्या वतीने बुधवारी (ता.5) ‘पौर्णिमा दिनानिमित्त’ आग्याराम देवी चौक येथे रात्री ऊर्जा बचतीच्या संदर्भात जनजागृती करण्यात आली. या उपक्रमाला स्थानिक व्यापारी आणि नागरिकांनी उदंड प्रतिसाद दर्शविला. पर्यावरणाविषयी जनजागृती साठी उत्तम माहिती पोहोचविणाऱ्या या स्तुत्य उपक्रमाला मा. आमदार प्रवीण दटके यांनी भेट देत उपस्थितांचा उत्साह वाढविला.

माजी आमदार तथा मनपाचे माजी महापौर प्रा. अनिल सोले यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या या अभियानाद्वारे शहराच्या विविध भागांमध्ये पौर्णिमेच्या रात्री अनावश्यक विद्युत दिवे एक तासासाठी बंद ठेवून ऊर्जा बचतीचा संदेश देण्यात येतो. या अभियानाला व्यापारी आणि नागरिकांनी उदंड प्रतिसाद दर्शवित आहेत.

याप्रसंगी स्वच्छ भारत नागपूरचे ब्रँड अँबेसिडर व ग्रीन व्हिजिल फाउंडेशनचे कौस्तव चॅटर्जी, मनपाचे कार्यकारी अभियंता राजेंद्र राठोड, दिलीप वंजारी यांच्या सह ग्रीन व्हिजिल फाउंडेशनचे सुरभी जयस्वाल, मेहुल कोसुरकर, बिष्णुदेव यादव, प्रिया यादव, श्रीया जोगे,  पिनाकी बानिक, पार्थ जुमडे, जान्हवी पारसकर यांच्यासह यांनी जनजागृती केली.

ग्रीन व्हिजिल फाऊंडेशनच्या स्वयंसेवकांनी व्यापारी बांधवांना एक तास विद्युत दिवे बंद करण्याचे आवाहन केले. या आवाहनाला आग्याराम देवी चौक परिसरातील व्यावसायिक, दुकानदार, नागरिकांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. मनपा आणि ग्रीन व्हिजिल फाउंडेशनच्या या संयुक्त प्रयत्नामुळे नागरिकांमध्ये पर्यावरणाविषयी आणि ऊर्जा बचतीविषयी जागरूकता वाढत आहे. स्थानिक नागरिकांनीही या अभियानात उत्साहाने सहभाग नोंदवून मनपाला सहकार्य केले आहे.