spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

‘लोकसंवाद-२०२६’ अंतर्गत गणेश मंडळांमध्ये शासकीय योजनांची जनजागृती

– जिल्हा माहिती कार्यालयाकडून विविध मंडळांना भेटी; माहितीपर घडीपत्रिकांचे वितरण

गडचिरोली :-  गणेशोत्सवानिमित्त शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजना व सेवांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या ‘लोकसंवाद-२०२६’ उपक्रमांतर्गत जिल्हा माहिती कार्यालय, गडचिरोलीमार्फत विविध गणेश मंडळांना भेटी देण्यात आल्या.

या उपक्रमांतर्गत बालगणेश युवक मंडळ, विवेकानंद नगर; श्रीकृष्ण नवयुवक गणेश मंडळ, खुटगाव; वीरबाबुराव शेडमाके गणेश मंडळ, कटेझरी, एकता सार्वजनिक गणेश मंडळ सावरगाव आणि बालगणेश मंडळ, सावरगाव येथे भेट देऊन मंडळांचे पदाधिकारी, कार्यकर्ते व उपस्थित नागरिकांना शासकीय योजनांची माहिती असलेल्या घडीपत्रिकांचे वितरण करण्यात आले.

गणेशोत्सवातील लोकसहभागाचा उपयोग शासनाच्या योजना व सेवांची माहिती अधिकाधिक नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी ‘लोकसंवाद-२०२६’च्या माध्यमातून करण्यात येत आहे. नागरिकांना विविध योजनांची माहिती मिळावी आणि पात्र लाभार्थ्यांना त्यांचा लाभ घेण्यासाठी प्रोत्साहन मिळावे, हा या उपक्रमाचा उद्देश आहे. संबंधित गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी या जनजागृती उपक्रमाला सहकार्य केले.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.