spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

पथनाट्याच्या माध्यमातून जनजागृती

तिरोडा :- महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने भावेश कोटांगले व टीम यांनी कन्सेप्ट कम्युनिकेशन लिमिटेड या संस्थेमार्फत विकास रायते यांच्या नेर्तृत्वात पथनाट्य सादर करण्यात आले.

सादरीकरणामध्ये विद्यार्थ्यांच्या शालेय शिक्षण त्यांनी पाहिलेले स्वप्न व ते साकार करण्यासाठी सामाजिक न्याय विभागाच्या वतीने असलेल्या योजना त्यामध्ये राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती योजना, राजश्री शाहू महाराज परदेश शिष्यवृत्ती योजना, बाबू जगजीवन छात्रवास योजना, स्वाधार योजना स्वाधार योजना कौशल्य विकास प्रशिक्षण, विद्यार्थ्यांसाठी राहण्यासाठी सामाजिक न्याय भवनाच्या वतीने वस्तीगृह व त्यामध्ये राहण्याची व्यवस्था परदेशी शिक्षण घेण्यासाठी येणे जाण्यासाठी विमानाची व्यवस्था तिथे राहण, जेवण सर्व व्यवस्थाही सामाजिक न्याय विभागाकडे राहील व इतर विविध योजनांची माहिती गीत गायन व पथनाट्याच्या माध्यमातून आपल्या अभिनयातून वाडेगावातील जनतेला समजावून दिले.

पंचायत समिती सभापती तेजराम चव्हाण, गणेश पुंडे, सरपंच शामराव बिसेन, किशोर नंदेश्वर, सुधीर वंजारी, भदरू बावणे, दिलीप नेवारे यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सहकार्य केले.पथनाट्य टीम मध्ये भावेश कोटांगले, तेजस कोटांगले, प्रल्हाद भुजाडे, करिष्मा भाग्यवंत, अर्चना कान्हेकर, स्नेहल लाडे ,संदिप कोटांगले, अतुल खेडीकर, संदेश राऊत,शामराव डोंगरवार, प्रशांत मेश्राम, महादेव पवार यांनी कलाकृती सादर केली.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.