spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

बालविवाह व सक्तीचे विवाह निर्मूलनासाठी गडेगाव येथे जनजागृती रॅली व विशेष कार्यशाळा उत्साहात

हंसराज,भंडारा लाखनी :- लक्ष्मी शिक्षण संस्था व क्रीडा मंडळ, केसलवाडा वाघ द्वारा संचालित स्थानिक स्व. निर्धन पाटील वाघाये कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या सांस्कृतिक विभागाच्या वतीने ‘बालविवाह व सक्तीचे विवाह निर्मूलन’ या आंतरराष्ट्रीय दिनानिमित्त शुक्रवार, दि. २७ नोव्हेंबर २०२६ रोजी गडेगाव येथे जनजागृती रॅली व विशेष कार्यशाळेचे उत्साहात आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान महाविद्यालयाचे कार्यकारी प्राचार्य प्रा. डॉ. गणेश कापसे यांनी भूषविले, तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉ. अनुराधा खांडे व प्रा. मंगेश कुकडे उपस्थित होते.

बालविवाह रोखणे, सक्तीच्या विवाहांचे निर्मूलन करणे, मुलींच्या शिक्षणाला प्रोत्साहन देणे आणि समाजात याबाबत व्यापक जनजागृती निर्माण करणे या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला. यावेळी गडेगाव येथे काढण्यात आलेल्या जनजागृती रॅलीच्या माध्यमातून नागरिकांना ‘बालविवाहमुक्त समाज’ निर्माण करण्याचा प्रभावी संदेश देण्यात आला. त्यानंतर झालेल्या विशेष कार्यशाळेत मार्गदर्शकांनी बालविवाहाचे सामाजिक दुष्परिणाम आणि मुलींच्या शिक्षणाचे अनन्यसाधारण महत्त्व याविषयी उपस्थितांना मार्गदर्शन केले.

बालविवाहमुक्त समाजाच्या निर्मितीसाठी शिक्षण, जनजागृती आणि सामाजिक सहभाग अत्यंत आवश्यक असल्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी प्रा. ज्ञानेश्वरी रहांगडाले, प्रा. यशोमती कागदे व प्रा. स्मिता तितरमारे यांनी विशेष परिश्रम घेतले.

Popular Articles