किशोर साहू : मौदा ,ता २५ : तालुक्यातील कोदामेंढी येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही पारंपरिक बैलपोळा उत्सव व तान्हा पोळा मोठ्या जल्लोषात व शांततेत साजरा करण्यात आला. पोळ्याच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांच्या सणाच्या आनंदात सहभागी जीवनाचे खरे साथीदार असलेल्या बैलांची पूजा करण्यात आली. बैलपोळा च्या दिवशी बाजार चौकात बैलजोडी सजवून आणलेल्या मालकांना ग्रामपंचायत तर्फे शाल ,श्रीफळ देऊन सन्मानित करण्यात आले. तान्हा पोळा च्या दिवशी लाकडी नंदीबैल सजून आणलेल्या बालगोपालांना ग्रामपंचायत तर्फे बक्षीसे व खाऊ देऊन सन्मानित करण्यात आले.
यावेळी सरपंच आशिष बावनकुळे उपसरपंच गोपाल गिरमेकर, माजी उपसभापती अशोक हटवार,
माजी सरपंच भगवान बावनकुळे , उमाकांत देवतळे, भाजपा नेते नरेश बावनकुळे, ग्रामपंचायत सदस्य गण विष्णु बावनकुळे,सदानंद मेश्राम,खुशाल शिवणकर रवी ठवकर, पोलीस पाटील प्रकाश देवतळे, सेवा सहकारी संस्थाध्यक्ष विवेक देवतळे,सामाजिक कार्यकर्ते अशोक घोलपे, बाळकृष्ण पंचभाई , दिनेश देवतळे ,अनिल मेश्राम,अमोल मोहुर्ले, पंकज खडसे, देवानंद मेश्राम व सर्व ग्रामपंचायत सदस्य गण,गावातील मान्यवर ,ज्येष्ठ, तरुण मंडळी , शेतकरी वर्ग व बालगोपाल उपस्थित होते.




