नागपूर :- डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी मार्फत महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जातीच्या उमेदवारांकरीता महाराष्ट्र लोकसेवा आयोग- राज्यसेवा मुख्य 2024 उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना मुलाखतीकरिता आर्थिक सहाय्य योजनेसाठी अर्ज मागविण्यात येत आहे. योजने अंतर्गत महाराष्ट्र लोकसेवा आयोग- राज्यसेवा मुख्य परीक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना मुलाखतीकरीता एकरकमी आर्थिक सहाय्य प्रदान करण्यात येणार आहे.
बार्टीकडून राबविण्यात येणाऱ्या या योजनेचा उद्देश अनुसूचित जातीतील होतकरू विद्यार्थ्यांना केंद्रीय व राज्यसेवा परीक्षांसाठी आवश्यक प्रशिक्षण व तयारीसाठी प्रोत्साहन देणे हा आहे.
यासाठी पात्र उमेदवाराने https://forms.gle/SC7BTENVDXCfmvtu5 या लिंकवर जाऊन दिलेला गुगल फॉर्म आवश्यक माहितीसह 30 सप्टेंबर च्या आत भरावा. अर्ज व्यवस्थित व अचूक भरल्याची खात्री केल्यावरच सबमिट करावा.
ऑनलाईन अर्जा व्यतिरिक्त उमेदवाराने सदर जाहिराती सोबत जोडलेला लेखी अर्ज भरावा. अर्जासोबत आवश्यक कागदपत्रांची स्व-साक्षांकित छायांकीत प्रत (हार्ड कॉपी) बार्टी, पुणे कार्यालयास पोस्ट/कुरियर द्वारे दिनांक 4 आक्टॊबरच्या आत मिळेल या अंदाजाने पाठवावी. लिफाफ्यावर ‘एम.पी.एस.सी- राज्यसेवा २०२५ मुलाखतीसाठी आर्थिक सहाय्य’ असे नमुद करावे.
सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन व ऑफलाईन दोन्ही स्वरुपात अर्ज करणे बंधनकारक आहे. केवळ ऑनलाईन किंवा फक्त हार्ड कॉपी जमा केल्यास अर्ज ग्राह्य धरला जाणार नाही याची विद्यार्थ्यांनी नोंद घावी. अर्जाची हार्ड कॉपी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था, (बार्टी) २८, क्वीन्स गार्डन, कॅम्प पुणे-४११००१ या पत्त्यावर पाठवावी. योजनेसंदर्भात अधिक माहितीसाठी ०२०-२६३३३३३०/२६३३३३३९/ या क्रमांकावर संपर्क साधावा. सविस्तर माहितीसाठी बार्टीच्या अधिकृत वेबसाईटला भेट देण्याचे आवाहन बार्टी कार्यालयामार्फत करण्यात आले आहे.




