spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

मुख्यमंत्री वयोश्री योजनेच्या लाभार्थ्यांनी आधार क्रमांक अपडेट करण्याचे आवाहन

 

नागपूर, ३०  : राज्यातील ६५ वर्ष वय त्याहून अधिक वय असणा-या जेष्ठ नागरिकांना त्यांच्या दैनदिन जिवनात सामान्य स्थिती जगण्यासाठी आणि त्यांना वयोमानपरत्वे येणारे अपंगत्व अशक्त पणा यावर उपाययोजना करण्यासाठी तसेच त्यांचे मानसिक स्वास्थ अबाधित ठेवण्यासाठी मुख्यमंत्री वयोश्री योजना शासनाने सुरु केली आहे. सदर योजनेंतर्गत सन २०२४-२५ या वित्तीय वर्षात नागपूर जिल्हयातील एकूण ३० हजार ६७४ पात्र लाभार्थ्यांना लाभ देण्यात आलेला आहे. परंतु काही लाभार्थ्यांचे आधार प्रमाणीकरण झालेले नाही अशा लाभार्थ्यांना अद्यापही लाभ मिळालेला नाही. अशा लाभार्थ्यांची यादी गट विकास अधिकारी, पंचायत समिती (सर्व), मुख्याधिकारी, नगर परिषद (सर्व), उपविभागीय अधिकारी (सर्व), या कार्यालयाची वेबसाईट www.acswnagpur.in व सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, नागपूर डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, बी.विंग पहिल माळा, शासकीय आयटीआय समोर, श्रध्दानंद नगर, नागपूर-२२ येथे उपलब्ध आहे. लाभार्थ्यांनी आपले आधार क्रमांक अपडेट करुन व इतर अनुषंगिक बाबींकरीता संबंधित कार्यालयात जाऊन जमा करावे, असे आवाहन समाज कल्याण विभागाच्या सहाय्यक आयुक्त सुकेशिनी तेलगोटे यांनी केले आहे.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.