नागपूर, ३० : महाराष्ट्र शासनाच्या अल्पसंख्यांक विकास विभागामार्फत समाज कल्याण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांचे मार्फत राज्यातील अल्पसंख्यांक समुदायातील विद्यार्थ्यांना परदेशामध्ये विशेष अध्ययन करण्यासाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षाच्या शिष्यवृत्तीकरीता विद्यार्थ्याकडून जाहिरातीव्दारे अर्ज स्विकारण्याची अंतिम तारीख १८ आगस्ट २०२५ अशी होती.
तथापि, सदर जाहिरातीस याव्दारे मुदतवाढ देण्यात येत असून आता अर्ज स्विकारण्याचा अंतिम दिनांक सप्टेंबरपर्यंत कार्यालयीन वेळ (सायंकाळी ६.१५) पर्यंत ठेवण्यात आलेला आहे.
तरी https://fs.maharashtra.gov.in या वेबसाईटवर विहीत नमुन्यातील परिपूर्ण भरलेला अर्ज, वाचनीय व सुस्पष्ट कागदपत्रे ऑनलाईन सादर करुन त्याची सुस्पष्ट प्रिंट, ऑफलाईन नमून्यातील अर्जासोबत समाज कल्याण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे या कार्यालयास १ सप्टेंबर (वेळ सायंकाळी ६.१५ वाजेपर्यंत) पर्यंत सादर करावीत. सन २०२५-२६ करीता या अगोदर अर्ज केलेल्या विद्यार्थ्यानी पुनःश्च अर्ज करण्याची आवश्यकता नाही.
अधिक माहितीसाठी शासनाचे संकेतस्थळ “www.maharashtra.gov.in” येथील ‘ताज्या घडामोडी” या लिंकवर भेट द्यावी.



