spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

भांडेवाडी प्लॉट घोटाळा: ₹३.०२ कोटींची फसवणूक; तिघांना पोलिसांची बेडी

 

नागपूर २० :  प्रतिनिधी – भांडेवाडी येथील शासकीय जमिनीवरील बोगस प्लॉट विक्री प्रकरणी तब्बल ₹३,०२,८३,२०० रुपयांच्या फसवणुकीचा भांडाफोड झाला असून, वाठोडा पोलिसांनी तीन आरोपींना अटक करून न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना ७ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. फिर्यादी शाहनवाज आलम हकिम अन्सारी (रा. नागपूर) यांनी २०१० साली मौजा भांडेवाडी येथील खसरा क्रमांक ११६/१, ११७/२ मधील प्लॉट क्र. १६ आरोपींकडून विकत घेतला होता. त्यानंतर आरोपींनी मोजणीमध्ये अधिक जमीन असल्याचे सांगून फिर्यादीला आणखी काही प्लॉट्स विकले. फिर्यादीने विविध प्लॉट्ससाठी एकूण ₹१,०९,२९,००० रुपयांचा करार केला आणि त्यापैकी ₹५२,७१,००० रुपये आरोपींना दिले. मात्र ६ जानेवारी २०२५ रोजी NIT चे पथक घटनास्थळी पोहोचले असता सदर जमीन NIT ची असल्याचे आणि ती १९६१ पासून सिवरेज व कचरा प्रकल्पासाठी राखीव असल्याचे समोर आले. तपासात उघडकीस आले की, आरोपींनी या जमिनीबाबत शासनाकडून मोबदला आधीच घेतला होता, तरीही त्यांनी बनावट सातबारा तयार करून, खरे मालक असल्याचे भासवले आणि फिर्यादीसह इतरांना प्लॉट विकले. या प्रकरणी वाठोडा पोलिस ठाण्यात गुन्हा क्रमांक १६२/२०२५ अंतर्गत आरोपींवर कलम ४२०, ४६७, ४६८, ४७१, ४७४, १२०(ब) भादंवि अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटक आरोपींमध्ये जफर उल्ला खान हफिजउल्ला खान, शादाब खान वल्द हिदायतुल्ला खान (दोघेही रा. नागपूर) आणि वकील अहमद अब्दुल करीम शेख (रा. पवणी, जि. भंडारा) यांचा समावेश आहे. या प्रकरणातील फसवणुकीची रक्कम तब्बल ₹३,०२,८३,२०० रुपये इतकी आहे. ही कारवाई पोलीस उपायुक्त (आर्थिक गुन्हे शाखा) नागपूर शहर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विनायक गोल्हे यांच्या नेतृत्वात करण्यात आली. त्यांना शरद कोकाटे, विजय गुरपुडे, उपेंद्र तायडे, सुषमाकर जांभुळकर, इशांक आटे व योगेश निघोट यांनी सहकार्य केले.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.