spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

घरफोडी विरोधी पथकाची मोठी कामगिरी; दोन आरोपी अटकेत, ₹९.६५ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

 

नागपूर २० – गिट्टीखदान पोलीस ठाणे हद्दीतील न्यू शांतीनगर, मडावी लेआऊट, दाभा येथे झालेल्या मोठ्या घरफोडी प्रकरणाचा छडा लावत गुन्हेशाखा घरफोडी विरोधी पथकाने दोन आरोपींना अटक करून तब्बल ₹९,६५,७०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. फिर्यादी सौ. कनिज परविन शेख रफीक (वय ५८) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, ०९ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी ११.३० वा. ते १३ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी ७.०० वा. दरम्यान, फिर्यादी व त्यांच्या कुटुंबीयांच्या अनुपस्थितीत अज्ञात चोरट्यांनी घराचे मुख्य दाराचे कुलूप व कडीकोडा तोडून घरात प्रवेश करून, बेडरूममधील कपाटातील रोख ₹१३,०००, सोन्याचे १३४ ग्रॅम दागिने, चांदीचे २१० ग्रॅम दागिने असा एकूण ₹९,६५,७०० किमतीचा मुद्देमाल चोरून नेला होता.

या प्रकरणी गिट्टीखदान पोलीस ठाण्यात कलम ३०५(अ), ३३१(३), ३३१(४) भा.दं.वि. अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपासादरम्यान गुन्हेशाखेच्या घरफोडी विरोधी पथकाने तांत्रिक तपास करून मिळालेल्या खात्रीशीर माहितीच्या आधारे आरोपींचा शोध लावला. पोलिसांनी सापळा रचून हरजीतसिंग उर्फ गरम अजबसिंग गरेवाल (वय ३४, रा. हुडको कॉलनी, शिवमंदिर जवळ, जरीपटका) व रजत चक्रधर खोब्रागडे (वय २१, रा. प्लॉट नं. २१८, हुडको कॉलनी, पंचशील वाचनालय जवळ, जरीपटका) यांना जरीपटका परिसरातून अटक केली.

चौकशीत आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली असून, आरोपी रजत खोब्रागडेच्या ताब्यातून सोन्या-चांदीचे दागिने, गुन्ह्यात वापरलेली मोटरसायकल (MH 49 CP 5752), मोबाईल फोन असा एकूण ₹१,३९,७५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आरोपींना मुद्देमालासह पुढील कारवाईसाठी गिट्टीखदान पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून, पुढील तपास सुरू आहे.

ही यशस्वी कारवाई  वरिष्ठांच्या   मार्गदर्शनाखाली, पोनि. भरत कराडे, सपोनि. नितीन चुलपार, प्रवीण मुल, पोउपनि. विवेक झिंगरे, पोहवा. प्रशांत गभने, गणेश बरडे, श्रीकांत उईके, प्रवीण रोडे, नापोअं. सुधीर पवार, हंसराज ठाकुर, पोअं. निलेश श्रीपात्रे, अमन राऊत तसेच सायबर टिम व आयकर युनिट यांच्या सहकार्याने करण्यात आली.

@filephoto

Popular Articles