spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

 नागपूरात दोन तरुणी बेपत्ता, पोलिसांचा शोध सुरू 

नागपूर २० : नागपूर शहरातील दोन वेगवेगळ्या भागांतून दोन तरुणी बेपत्ता झाल्याच्या घटना समोर आल्या असून यामुळे परिसरात चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे. पोलिसांनी याबाबत शोधमोहीम सुरू केली असून नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन केलं आहे.

 कपिलनगर पोलीस ठाणे हद्दीतून

जान्हवी मच्छींद्र शेलारे (वय १८ वर्षे, रा. खसाळा, लेंडे नगर, नाका क्र. २, कामठी रोड, कपिलनगर, नागपूर) ही दिनांक १८ ऑगस्ट २०२५ रोजी दुपारी ३.३० वाजता घरातून कोणालाही काही न सांगता निघून गेली. सायंकाळपर्यंत ती घरी परतली नाही. कुटुंबीयांनी तिचा शोध घेतला असता ती मिळून आली नाही, त्यामुळे त्यांनी कपिलनगर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे.

 नंदनवन पोलीस ठाणे हद्दीतून

सौ. समीता अमोल तांबे (वय २२ वर्षे, रा. नंदनवन झोपडपट्टी, गल्ली क्र. ३, नागपूर) या दिनांक १४ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी ७.०० वाजता आपल्या माहेरी चंद्रपूर येथे जाण्यासाठी घरून निघाल्या होत्या. मात्र त्या चंद्रपूरला न पोहोचता अद्याप घरीही परतल्या नाहीत. कुटुंबीयांनी नंदनवन पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली असून पोलिसांनी शोधमोहीम सुरू केली आहे.

पोलिसांनी नागरिकांना आवाहन केलं आहे की, जान्हवी शेलारे किंवा समीता तांबे यांच्याबद्दल काही माहिती मिळाल्यास तात्काळ कपिलनगर पोलीस ठाणे किंवा नंदनवन पोलीस ठाणे येथे संपर्क साधावा.

Popular Articles