किशोर साहू, मौदा :- शनिवार (ता. 29 ऑगस्ट) ला दरवर्षीप्रमाणे यंदाही चाचेर गावातील किरात-किराड समाजाच्या वतीने अनेक वर्षांपासून जपली जाणारी भुजरिया-कजलिया पर्व यंदाही उत्साहात साजरा करण्यात आला.
याप्रसंगी महिला भगिनींची पारंपरिक वेशभूषा, सजवलेली भुजरिया, ढोल-ताशे व बँडच्या गजरात भव्य रॅली काढण्यात आली.

नाल्यावर भुजरियाचे पूजन व स्वच्छता करून पुन्हा गावातील प्रत्येक मंदिरात जाऊन देवचरणी अर्पण करून यानंतर राम राम, नमस्कार आणि वडीलधाऱ्यांचे आशीर्वाद घेत एकमेकांप्रती प्रेम, सन्मान व बंधुभाव जपण्याचा सुंदर संदेश देण्यात आला.
याप्रसंगी रामटेक विधानसभा – 59 बळीराजा पांदण रस्ते समिती सदस्य विकास झाडे, रोशन बरबटे, केशवराव झाडे, अनुराग बादोले, निरंजन बोदोले, स्वप्नील झाडे, अशोक गडे, अनिल खंडाईत रामेश्वर बादोले, बम्हानंद बादोले, शंकर गडे, किरन बरबटे, भोला बरबटे, समिर झाडे, प्रफुल बादोले, नरेश बादोले, सचिन बादोले, बाळा खंडाईत, उमेश महादुले, कमलेश झाडे, राजू झाडे, शुभम गडे, महेश महादुले, डॉ. दिनेश बादोले, अशोक झाडे, मयुर गडे, अमित खंडाईत, राकेश खंडाईत, रमेश खंडाईत, प्रशांत बरबटे सह सर्व समाज बांधव आणि महीला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.





