spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

एमजी नगर पुलियावर ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार गंभीर जख्मी

– ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल; अपघातानंतर चालक फरार

कन्हान :- शहरातील तारसा रोड रेल्वे उडाण पुल एमजी नगर येथे भरधाव ट्रकने समोरून जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार गंभीर जख्मी झाल्याची घटना घडली आहे. अपघाता नंतर ट्रक चालक घटना स्थळावरून पसार झाला.

प्राप्त माहितीनुसार गुरुवार (दि.११) जून रोजी रात्रीच्या सुमारास नितीन नामदेव सरोते वय ३५ वर्ष, रा. बोरी-सिंगोरी हे आपल्या अँक्टिव्हा स्कुटी क्रमांक एमएच ४० बीएन ७४८६ ने कन्हान वरून तारसा मार्गे घरी जात होते. यावेळी तारसा रोड ने कन्हानकडे येणा ऱ्या ट्रक क्रमांक एमएच ४० बीएल ६४१९ च्या चाल काने भरधाव व निष्काळजीपणे वाहन चालवत विरुद्ध दिशेने येऊन दुचाकीला समोरून जोरदार धडक दिली. या भीषण धडकेत नितीन सरोते हे वाहनासह रस्त्यावर पडुन गंभीर जख्मी झाले. तसेच दुचाकीचे मोठ्या प्रमा णात नुकसान झाले. अपघातानंतर ट्रक चालक वाहना सह घटना स्थळावरून पसार झाला. घटनेची माहिती मिळताच कन्हान पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत स्थानिक नागरिकांच्या मदतीने जख्मी नितीन सरोते यांना उपचारासाठी मेडिकल रुग्णालयात दाखल केले. या प्रकरणी प्रमोद नामदेव सरोते यांच्या तक्रा रीवरून ट्रक चालकाविरुद्ध कन्हान पोलिसांनी गुन्हा दाखल केला असुन पुढील तपास पोलीस निरीक्षक वैजयंती मंडवधरे यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे .

नागरिकांचे चक्का जाम आंदोलन ; जड वाहतुकीवर तात्काळ बंदीची मागणी

गुरुवारी रात्री झालेल्या अपघातानंतर संतप्त नागरिकांनी शुक्रवार (दि.१२) ला सकाळी तारसा रोड गहुहिवरा चौकात चक्का जाम आंदोलन करत तारसा रोड व रेल्वे पुलावरून सुरू असलेली जड वाहतुक तात्काळ बंद करण्याची मागणी केली. आंदोलनामुळे काही काळ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असुन रस्त्याच्या दोन्ही बाजुना वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. शहरातुन व रेल्वे उडाण पुलावरून जड वाहतुक बंद असुन सुध्दा मागील काही दिवसांपासुन शहरातील गहुहिवरा चौकाजवळील तारसा रोड रेल्वे पुलावरून मोठ्या प्रमाणात ओव्हर लोड जड वाहनांची धोकादायक वाहतुक सुरू आहे. कोळसा, राख, गिट्टी व माती वाहुन नेणारे ट्रक टोल नाका टाळण्यासाठी थेट शहरातुन मार्गक्रमण करत असल्याचा आरोप नागरिकांनी केला. या मार्गावर शाळा, महाविद्यालये, बाजारपेठ तसेच मोठ्या प्रमाणा त नागरिकांची वर्दळ असल्याने अपघाताचा धोका वाढला असुन नागरिकांच्या जीवितास गंभीर धोका निर्माण झाला आहे. दररोज हजारो विद्यार्थी, पादचारी आणि दुचाकीस्वार या पुलावरून ये-जा करीत असताना मोठ्या वाहनांमुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वारंवार होत असलेल्या अपघातांच्या पार्श्व भूमीवर प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून जड वाह तुकीवर निर्बंध घालावेत, अशी मागणी आंदोलनकर्त्यां नी केली.

आंदोलनाची माहिती मिळताच कन्हान पोलीस निरीक्षक वैजयंती मंडवधरे या पोलीस कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाल्या. त्यांनी आंदोलनकर्त्यांशी चर्चा करून त्यांच्या समस्या जाणुन घेतल्या. जड वाह नांवर नियंत्रण ठेवण्यासाठी संबंधित विभागांशी समन्व य साधुन आवश्यक उपाय योजना करण्यात येतील असे आश्वासन त्यांनी दिले. बराच वेळ समजुत काढ ल्यानंतर आणि योग्य कारवाईचे आश्वासन मिळाल्या नंतर आंदोलनकर्त्यांनी चक्का जाम आंदोलन मागे घेतले. त्यानंतर वाहतुक पुन्हा सुरळीत करण्यात आली . नागरिकांनी मात्र जड वाहतुकीच्या प्रश्नावर कायमस्व रूपी तोडगा काढण्याची मागणी प्रशासनाकडे केली आहे.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.