spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

स्वच्छ बस डेपो, स्वच्छ शहर म्हणत काढली प्रभात फेरी

– मोरभवन डेपो मध्ये स्वच्छतेच्या जागरासह वृक्षारोपण

– विविध सामाजिक संघटनांनी केले श्रमदान

– पर्यावरण संवर्धन पंधरवड्यानिमित्त मनपाचे विशेष अभियान

नागपूर :- शहरातील बस स्थानकेही शहराची ओळख मानली जाते अशात बस स्थानक व बस डेपो जितके स्वच्छ असेल तितकेच प्रवाशांना सुरक्षित आणि शहराची आठवण ठेवण्यात मदत करते याच उद्देशाने नागपूर महानगरपालिकेद्वारा राबविण्यात येणाऱ्या पर्यावरण संवर्धन पंधरवाड्यानिमित्त आयोजित ‘विशेष स्वच्छता अभियानांतर्गत आपली बस च्या मोरभवन बस डेपो व इतर डेपोंची स्वच्छता करण्यात आली. स्थायी समिती सभापती शिवानी दाणी वखरे यांनी स्वच्छता मोहिमेचे नेतृत्व करीत परिसर स्वच्छ केला. यावेळी त्यांनी प्रभात फेरीला हिरवी झेंडी दाखवत रवाना केले.

नागपूर महानगरपालिकेच्यावतीने 5 ते 21 जून या कालावधीत संपूर्ण शहरात ‘विशेष स्वच्छता अभियान’ राबविण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत महापौर निता ठाकरे, उपमहापौर लिला हाथीबेड, स्थायी समितीच्या सभापती शिवानी दाणी-वखरे, सत्ता पक्षनेते नरेंद्र (बाल्या) बोरकर, मनपा आयुक्त डॉ. विपीन, विरोधी पक्ष नेता संजय महाकाळकर यांच्या निर्देशानुसार शहरातील बस डेपो परिसराची साफसफाई मोहीम यशस्वीपणे राबविण्यात आली. घनकचरा व्यवस्थापन विभागाचे सफाई कर्मचारी तसेच डिस्ट्रिक्ट बार असोसिएशन आणि ग्रीन व्हिजिल फाउंडेशन यांच्यासह इतर स्वयंसेवी संस्थेच्या स्वयंसेवकांनी सहभाग नोंदविला.

याप्रसंगी स्थायी समिती सभापती शिवानी दाणी वखरे यांच्यासह परिवहन व्यवस्थापक डॉ.मेघना वासनकर, सहाय्यक आयुक्त राजकुमार मेश्राम, डिस्ट्रिक्ट बार असोसिएशनचे अध्यक्ष एड. प्रकाश जयस्वाल, मनपाचे मुख्य स्वच्छता अधिकारी डॉ. गजेंद्र महाले, प्रशासकीय अधिकारी  योगेश लुंगे, पंकज पाराशर, कन्हैया राठोड, अरुण पिपरु, राजीव घाटोळे, गजानन नागुलवार, प्रविण सरोदे,संजय चाऊलवार, यांच्यासह डिस्ट्रिक्ट बार असोसिएशनचे उपाध्यक्ष एड. विकास कऱ्हाडे,सचिव एड. अनिल गुल्हाने, एड. सौरभ राऊत, एड. मेघना बोबडे यांच्यासह ग्रीन व्हिजील फाऊंडेशनचे स्वयंसेवक कौस्तव चॅटर्जी, सुरभी जयस्वाल, मेहुल कोसुरकर, शितल चौधरी, विष्णूदेव यादव, श्रिया जोगे, प्रिया यादव, पिनाकी बानिक, प्रतीक इसमपेल्लीवार, तुषार देशमुख यांच्यासह मनपाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

प्रभात फेरीला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

आपली बसच्या मोरभवन डेपो येथून काढण्यात आलेल्या प्रभात फेरीला नागरिकांनी देखील उत्स्फूर्त प्रतिसाद दर्शविला. प्रभात फेरीची सुरुवात मोर भवन बस डेपो येथून झाली पुढे व्हेरायटी चौक होत, झांसी राणी चौक वरून मुंजे चौक येथे पोहोचली. रॅली दरम्यान नागरिकांनी देखील प्रभात फेरीत सक्रिय सहभाग नोंदविला, यावेळी मनपाचे सफाई कर्मचारी, बस संचालक, बस चालक, वाहक व उपद्रवशोधपथकाचे जवान प्रामुख्याने उपस्थित होते.

वृक्षारोपण करीत दिला पर्यावरण संवर्धनाचा संदेश

पर्यावरण संवर्धन पंधरवड्याअंतर्गत मोर भवन बस डेपो सह इतर ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आली. यावेळी पर्यावरण संवर्धनासह झाडे लावा हा संदेश देण्यात आला.

श्रमदानाने परिसर स्वच्छ

मनपाद्वारे राबविण्यात आलेल्या सफाई अभियानांतर्गत डिस्ट्रिक्ट बार असोसिएशन आणि ग्रीन व्हिजन फाउंडेशन यांच्या स्वयंसेवकांनी उत्स्फूर्तपणे श्रमदान करीत संपूर्ण परिसर स्वच्छ केला.

इतर डेपो मध्ये ही स्वच्छता

नागपूर महानगरपालिका परिवहन विभागाच्या आपली बस डेपो मध्ये स्वच्छता मोहीम उत्साहाने राबविण्यात आली मोर भवन डेपोसह आपली बसच्या वाठोडा डेपो -1, पटवर्धन डेपो,कोराडी डेपो,हिंगणा डेपो, वाठोडा डेपो -2, खापरी डेपो,वाडी डेपो आधी परिसरात स्वच्छता करण्यात आली.

आमराई साठी एक तास आज

नागपूर महानगरपालिकेच्या स्वच्छता मोहिमेत आमराई येथे विशेष स्वच्छता केली जात आहे. रविवार १४ जून रोजी नागरिकांनी एक तास आमराई स्वच्छतेसाठी यावं असे आवाहन स्थायी समिती सभापती शिवानी दाणी वखरे यांनी केले आहे. त्या म्हणाल्या की, नागपूर महानगरपालिकेच्या आवाहनानंतर वृक्षीत फाउंडेशनने आमराई स्वच्छता अभियान हाती घेतले असून ते अत्यंत स्तुत्य आणि प्रेरणादायी कार्य करत आहेत. त्यांच्या या उपक्रमाला सर्वसामान्य नागरिकांनीही साथ देणे गरजेचे आहे.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.