spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

मोगरकसा येथे पक्षी सप्ताहाचा थाटात समारोप

– पक्षी निरिक्षण करून स्थानिक व स्थलांतरीत पक्ष्यांची घेतली नोंद

सचिन चौरसिया,प्रतिनिधी रामटेक :- थोर पक्षी तज्ञ स्व. मारूती चितमपल्ली व स्व.डॉ. सलीम अली यांच्या जन्म शताब्दी निमित्य ५ ते १२ नोव्हेंबर दरम्यान पक्षी सप्ताह साजरा करण्यात येतो. यानिमित्य बुधवार (दि.१२) नोव्हेंबर रोजी पवनी वनपरिक्षेत्रातील मोगरकसा येथे पक्षी सप्ताहचा समारोप कार्यक्रम करण्यात आला. समारोप कार्यक्रमाकरीता मथुरादास मोहोता विज्ञान महाविद्यालय, नागपूर मधील पदवी आणि पदव्युत्तर तसेच संशोधन ५० विद्यार्थ्यांनी अविनाश लोंढे मानव वन्यजीवरक्षक, नागपूर यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षी निरिक्षण करून स्थानिक व स्थलांतरीत पक्ष्यांची नोंद घेतली. उपक्रमाचे अध्यक्ष रामटेक चे सहाय्यक वनसंरक्षक गोविंदा लुचे, प्रमुख अतिथी म्हणून मथुरादास मोहोता महाविद्यालयाच्या डॉ. उमा सोनपराते, डॉ. भावना सलामे, इंस्टिट्युट ऑफ साइंस चे प्राध्यापक श्रीकांत बोरकर, डॉ. नागेश इमूल यांच्या प्रमुख उपस्थितीत संशोधक अभ्यासकांनी मोगरकसा परिसरातील पक्षी, बुरशी, फूलपाखरू, किटक व वनस्पती यांचा अभ्यास केला. याप्रसंगी गोविंदा लुचे सहायक वनसंरक्षक यांनी विद्यार्थ्यांना दैनंदिन जिवनात वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवून पर्यावरणाचा अभ्यास व नैसर्गिक जीवनशैली आचरण करण्याचे आवाहन आपल्या अध्यक्षीय भाषणातून केले. सदर उपक्रम डॉ. विनीता व्यास (भा.व.से.) उपवनसंरक्षक, नागपूर वनविभाग नागपूर यांच्या मार्गदर्शनाखाली पवनी चे वनपरीक्षेत्र अधिकारी सागर बनसोड व पुर्व पेंच पिपरीया चे वनपरीक्षेत्र अधिकारी विवेक राजूरकर यांनी आयोजन केले होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रमेश चाके क्षेत्रसहायक सालई, अनुप चिखलोंडे वनरक्षक, सहादेव वायबसे वनरक्षक, श्रीमती भारती काळे वनरक्षक, नाना कोसरे, सेवक पिलघरे, सुनील टेकाम, विठ्ठल क्षिरसागर ईत्यादींनी परिश्रम घेतले.

Popular Articles