spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

हेल्मेट घाला, सुरक्षित राहा.. रस्ते अपघातातून सुरक्षेसाठी – सुनीता बजाज

– प्रकाश हायस्कूल येथे २८८ हेल्मेटचे मोफत वाटप

सचिन चौरसिया,प्रतिनिधी रामटेक :- भारतात दुचाकी वापरणार्‍यांची संख्या जास्त आहे. मात्र, वाहन चालवताना स्वतःचा सुरक्षेसाठी हेल्मेट घालण्याची शिस्त दिसत नाही. साधारण कुटुंबातील पालक दुचाकीवर बसून मुलांना शाळेत सोडायला जातात. डोक्यावर हेल्मेट नसल्याने अपघात घडल्यास त्यांच्या जीवाला धोका होतो. अपघातांना आळा घालण्यासाठी हेल्मेट सक्ती आवश्यक असल्याचे मत प्रभाव फाऊंडेशनच्या समन्वयक सुनीता बजाज यांनी व्यक्त केले.

प्रकाश हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, कान्द्री माईन येथे झालेल्या पालकसभेत त्या बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक मिलिंद वानखेडे तर प्रमुख पाहुणे म्हणून अश्विनी बजाज, गटशिक्षणाधिकारी विजय भाकरे आणि शिक्षण विस्तार अधिकारी शालिनी रामटेके उपस्थित होते. या कार्यक्रमात २८८ हेल्मेटचे मोफत वाटप करण्यात आले. गटशिक्षणाधिकारी भाकरे यांनी प्रकाश हायस्कूलच्या उपक्रमाचे कौतुक केले, तर मुख्याध्यापक वानखेडे यांनी प्रभाव फाऊंडेशनच्या सहकार्याने ग्रामीण भागात जनजागृतीचे कार्य सुरू असल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे संचालन कामिनी पाटील यांनी केले, तर आभार अशोक नाटकर यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्याम गासमवार, विजय लांडे, सुचिता बिरोवले आदींनी परिश्रम घेतले.

 “अपघात सांगून होत नाही. म्हणूनच कारवाईच्या भीतीने नव्हे तर जीवाच्या प्रेमाने हेल्मेट वापरा. गाडी चालविताना मोबाईल वापर टाळा.” – सुनीता बजाज

Popular Articles