नागपूर :- सेवादलनगर ज्येष्ठ नागरिक मंडळातर्फे आयोजित करण्यात आलेल्या सहलीला 13 नोव्हेंबर रोजी सेवादल नगर ज्येष्ठ नागरिक मंडळातर्फे सर्वप्रथम भक्तमंडळीनी रामटेक येथील गड मंदिरातील प्रभूश्रीरामाचे, हनुमानाचे दर्शन घेतले. गड मंदिरावरून रामटेक शहराचा विलोभनीय व निसर्गरम्य देखावा बघून सर्व भक्तमंडळीचे मन आनंदाने भरून आले. तिथून थोड्या काही अंतरावर भक्तीधाम मध्ये देव-देवतांचे दर्शन घेतल्यानंतर सर्वांनी निसर्गाच्या सानिध्यात स्वादिष्ट भोजनाचा आनंद घेतला. भक्तीधाम या ठिकाणी पूर्णब्रह्म अभियानाबाबतची सविस्तर माहिती पदाधिकारी सुरेश उरकुडे व विठ्ठलराव घोडे यांनी दिली. योग-साधना याबाबतची माहिती संध्या रमेश लायस्कर, मधुकरराव सोनवणे, बाबा जाधव, कोरडे यांनी दिली.
या सहलीसाठी ज्येष्ठ नागरिक प्रतिष्ठान नागपूर यांनी विनामूल्य बस देऊन सहकार्य केले. प्रतिष्ठान तर्फे बस उपलब्ध करून दिल्याबद्दल डॉ.राजीव मिश्रा (सचिव) यांच्या सहकार्याबाबत आम्ही सर्व भक्तमंडळीं त्यांचें आभारी आहोत. सहल यशस्वी करण्यासाठी सेवादल नगर ज्येष्ठ नागरिक मंडळातील पदाधिकारी नामदेवराव खाटके, सुरज भानसिंग, प्रवीण सुरकर, छोटूजी जगनाडे, साहेबराव सरोदे, जयरामसिंग ठाकूर, रामकृष्णा रायमल, प्रा.अशोक मंदे, माया फंदी, मनोरमा लायस्कर व सर्व भक्तमंडळींचे सहकार्य लाभले.अशी माहिती प्रा. अशोक मंदे यांनी प्रसिद्धी पत्रकार दिली.








