तुकडोजी पुतळा गोंडवाना सभागृहात थाटामाटात विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा संपन्न
नागपूर १० : बिरसा सेवा फाऊंडेशन व जय पेरसापेन आदिवासी महिला बचत गट नागपूर च्या संयुक्त विद्यमाने 10 वी व 12 वी ची परिक्षा उत्तिर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा उत्साहपूर्वक स्वागत व सत्कारचा समारोह आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाचे अध्यक्ष सेवानिवृत्त उपनिरीक्षक आरपीएफ कवडूजी गेडाम, उद्घाटक सेवानिवृत्त अप्पर जिल्हाधिकारी सुधाकर कुळमेथे व प्रमुख अतिथी आदिवासी विचारवंत प्रकाश मडावी यांनी दिप प्रज्वलन केल्यानंतर संविधान उद्देशिकाचे वाचन करून कार्यक्रमाचा शुभारंभ केला. या कार्यक्रमाची थीम ‘नविन स्वप्नाची पहिली उडाण’ होती. प्रास्ताविकमध्ये शाम सराटेंनी विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाडविण्यासाठी प्रेरणादायक संदेश दिला. कार्यक्रमाचे उदघाटक कुळमेथे यांनी विद्यार्थ्यांना पारंपारिक विकल्पाच्या व्यतिरिक्त सीए जैसे क्षेत्रामध्ये करियर बनविण्यासाठी मार्गदर्शन केले. प्रमुख अतिथी मडावी, जान्हवी मडावी यांनी मार्गदर्शन केले. अध्यक्षीय भाषणामध्ये गेडाम यांनी विद्यार्थ्यांना उज्वल भविष्यासाठी शुभकामना दिल्या. प्रमुख अतिथी यांनी विद्यार्थ्यांचा सन्मान करून पुरस्कार मध्ये ट्राफी व लॅपटॉप बॅग भेट दिली. कार्यक्रमामध्ये एकूण 70 विद्यार्थी मधून 53 विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सफल संचालन ज्ञानेश्वर सयाम यांनी केले आणि राजु मडावी ने आभार प्रदर्शन केले. रामलाल कोकोडे, राजु मडावी, शाम सराटे, ज्ञानेश्वर सयाम, ललितकुमार परतेकी, गुणवंत आत्राम, सिताराम केराम, राजु पेन्दोर, विनोद केराम, लालतकुमार गोपाल कोडापे, संजय मडावी, गणेश परतेकी, विठ्ठल मसराम, राजेंद्र पोयाम, आर.आर. कुळसंगे, गणेश जुमनाके आदिंनी सहकार्य व अथक प्रयास केले.




