नागपूर :- भारतीय जनता पार्टी नागपूर महानगरद्वारे आज राजकारणाच्या पलीकडे जाऊन कुठलाही राजनीतिक बैनर ,झेंडा , दुपट्टा न घालता बुधवारी श्री गुरु पौर्णिमेनिमित्त विविध क्षेत्रात बहुमूल्य योगदान देणाऱ्या व गुरु शिष्य परंपरा चालविणाऱ्या नागपुरातील ६१ गुरुजनांचा घरी जाऊन पूजन व सन्मान करण्यात आला. यामध्ये विशेषतः आध्यात्मिक,सांस्कृतिक, संगीत, क्रीड़ा, आखाड़ा, शैक्षणिक आणि नाट्यक्षेत्रातील गुरूंचा सन्मान सोहळा भाजपा शहर अध्यक्ष दयाशंकर तिवारी यांचे नेतृत्वात संपन्न झाला. यामध्ये परमपूज्य आचार्य १०८ श्रीप्रज्ञाश्रमण सरस्वताचार्य देवनंदी महाराज यांच्या शिष्या गणिनी आर्यिका प्रज्ञा माताजी व गणिनी आर्यिका सुज्ञान श्री माताजी याना दयाशंकर तिवारी यांचे द्वारे अभिवादन करून सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. तसेच वेदमूर्ती दामोदर धामणकर शास्त्री, समर्थ सेवा प्रतिष्ठान च्या मोहिनी खोत, सुप्रसिद्ध होमिओ तज्ञ डॉ विशोधन मुरकुटे, राष्ट्रसंत तुकडोजी विद्यापीठाच्या कुलगुरू मनाली क्षीरसागर, महंत माधवदास महाराज, ज्येष्ठ रंगकर्मी प्रभाकरराव ठेंगडी, किशोर आयलवार, अहिल्या मंदिराच्या कार्यवाहिका सारिका राजूरकर, आविष्कार कला संस्थेच्या संगीत तज्ज्ञ स्मिता जोशी, भाऊसाहेब खर्डेनवीस, महंत माधवदास बाबा,सुनील नाईक , शिला खंझोडे, प्रद्युम्न जोशी , मुनी दर्शन महाराजआदी गुरुजनांचा भाजपच्या मंडळ अध्यक्ष, नगरसेवक व पदाधिकारी यांनी त्यांच्या गुरुस्थानात जाऊन शाल श्रीफळ व गौरवचिन्ह देऊन सन्मान केला. या गुरुपूजन सोहळ्याचे संयोजन भाजपा आध्यात्मिक आघाडीचे अध्यक्ष डॉ श्रीरंग वराडपांडे, यांनी केले. यावेळी शहर महामंत्री श्रीकांत आगलावे, समाजसेवक सतीश पेंढारी, भाजप जैन प्रकोष्ठ चे अध्यक्ष मुकेश जैन, सांस्कृतिक आघाडीचे कुणाल गडेकर, संतोष जैन, आध्यात्मिक आघाडीचे चंद्रशेखर दुबे,सुजाता कठवते, दर्शन नाखते,अभिजित कथले आदी पदाधिकारी उपस्थित होते.तसेच कार्यक्रमाला यशस्वितेसाठी विष्णू चांगदे ,रितेश गावंडे, संदीप जाधव, अनिल मानापुरे, श्याम चांदेकर, ईश्वर ढेंगळे, विनोद बघेल, विनय दाणी, ईश्वर ढेंगळे, अमित पांडे, ओमप्रकाश इंगळे, राजेंद्र गोतमारे, अमर खोडे, शशांक खेकरे, किरण दातीर, प्रकाश यादव, महेंद्र भुगावकर, राजेश ठाकूर, प्रदीप पोहणे, संजय चौधरी, शेषराव गोटमारे, विनोद शिंदे, दिलीप दिवे, संजय बालपांडे आदी मंडळ अध्यक्ष यांचे विशेष सहकार्य लाभले.
गुरुपौर्णिमा पर्व निमित्त भाजपा नागपूर द्वारे गुरुपूजन व गुरुजनांचा सन्मान


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.
Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.




