किशोर साहू, मौदा :- बुधवार (ता. ११ फेब्रुवारी) ला भाजपा जनसंपर्क कार्यालय चाचेर येथे पं. दीनदयाल उपाध्याय यांची पुण्यतिथि त्यांच्या फोटोला माल्यार्पण ,पुष्प अर्पण करून व उपस्थित मान्यवरांनी त्यांच्या जीवनपटावर प्रकाश टाकून साजरी केली.
याप्रसंगी भारतीय जनता युवा मोर्चा नागपुर ग्रामीण उपाध्यक्ष संजू वाघमारे,महामंत्री चाचेर मंडळ अशोक बावनकुळे, सदस्य युवा मोर्चा नागपुर ग्रामीण नंदू मेहर, उपसरपंच धनराज हारोडे,मोतीराम घरजाळे, सामाजिक कार्यकर्ते कुंजीलाल बरबटे, किरण बरबटे, राहुल लांजेवार ,राहुल मेश्राम, शंकर बावनकुळे सह चाचेर मंडळातील भाजपा व भाजयूमो पदाधिकारी उपस्थित होते.




