नागपूर :- ग्रामपंचायत सावळी ता. पारशिवनी जि. नागपूर अंतर्गत चिचोली येथील सभामंडप बांधकामाची चौकशी व मोजमाप करायला आलेले गटविकास अधिकाऱ्यांसह तांत्रिक अधिकारी चौकशी न करताच परत गेले ! यासंदर्भात उपसरपंच केतन शाहूजी सहारे यांनी पत्रकारांना आपबिती सांगितले की ग्रामपंचायत मध्ये झालेल्या रोड व सभा मंडपाच्या बांधकामात झालेल्या भ्रष्टाचाराबाबत वेळोवेळी वरिष्ठांकडे निवेदन सादर केले तथापि प्रशासनाने अद्यापही गंभीर दखल न घेतल्याने तसेच चौकशीसाठी आलेल्या चौकशी समितीने थातुर मातूर चौकशी करून गावकऱ्यांनी सांगितलेल्या गोष्टींकडे दुर्लक्ष करून निघून गेल्याचे निदर्शनात आले. करिता याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नागपूर यांनी तातडीने दखल घेऊन उच्चस्तरीय चौकशीची मागणी केली जात आहे.
पत्रकार परिषदेमध्ये आझाद समाज पार्टीचे विदर्भ ( पूर्व चे ) अध्यक्ष नितीन नागदेवते, प्रदेश महाराष्ट्र डॉ.जे बी रामटेके आणि पूर्व विदर्भ मिडिया प्रभारी सुशील ढोलेकर तसेच करण निस्ताने, रोशन चिल्लीखेडे, दीपांशू बगले, नितेश निस्ताने, मुकेश पगारे, दिनेश गोणमारे, अकलेश वाटणे, इतरही समस्त गावकरी उपस्थित होते.








