spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

भंडारा-गोंदिया स्थानिक प्राधिकरण मतदारसंघात भाजपचे अविनाश ब्राह्मणकर विजयी

हंसराज भंडारा :- महाराष्ट्र विधान परिषद भंडारा-गोंदिया स्थानिक प्राधिकरण मतदारसंघ निवडणुकीची मतमोजणी प्रक्रिया आज जिल्हाधिकारी कार्यालयातील वैनगंगा सभागृह आज सकाळी 8 वाजता सुरू झाली .यावेळी निवडणूक निरीक्षक नितीन पाटील जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी सावन कुमार यांच्या प्रमुख उपस्थितीत शांततापूर्ण व पारदर्शक वातावरणात पार पडली. मतमोजणीनंतर भारतीय जनता पक्षाचे उमेदवार अविनाश ब्राह्मणकर यांनी विजय संपादन केला.

महाराष्ट्र विधान परिषद भंडारा-गोंदिया स्थानिक प्राधिकरण मतदारसंघ निवडणुकीच्या मतमोजणी प्रक्रियेला जिल्हाधिकारी कार्यालयातील वैनगंगा सभागृह येथे सुरुवात करण्यात आली. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी राजेंद्र कुमार जाधव, निवासी उपजिल्हाधिकारी तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी मनोहर चव्हाण, उपजिल्हाधिकारी (निवडणूक) विकास व्यवहारे, उपजिल्हाधिकारी जे.पी. लोंढे, नायब तहसीलदार (निवडणूक) रोशनी दिघोरे यांच्यासह निवडणूक विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

मतमोजणीअंती भारतीय जनता पक्षाचे उमेदवार अविनाश ब्राह्मणकर यांनी 302 मते प्राप्त करून विजय संपादन केला. प्रतिस्पर्धी उमेदवार नरेश ईश्वरकर यांना 154 मते मिळाली, तर सचिन कुंभलकर यांना एकही मत प्राप्त झाले नाही.

एकूण 457 मतांपैकी 1 मत अवैध ठरले असून 456 मते वैध ठरली. मतमोजणीनंतर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी विजयी उमेदवार अविनाश ब्राह्मणकर यांना विजयी प्रमाणपत्र प्रदान केले. यावेळी निवडणूक निरीक्षक नितीन पाटील तसेच जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी सावन कुमार उपस्थित होते.

भंडारा-गोंदिया स्थानिक प्राधिकरण मतदारसंघातील चार मतदान केंद्रांमधून एकूण 457 मतपत्रिका प्राप्त झाल्या. यामध्ये भंडारा केंद्रातून 166, साकोली केंद्रातून 61, गोंदिया केंद्रातून 154 आणि सडक-अर्जुनी केंद्रातून 76 मतपत्रिका प्राप्त झाल्या. त्यापैकी 1 मत अवैध ठरल्यामुळे 456 मतांची मोजणी करण्यात आली.

संपूर्ण मतमोजणी प्रक्रिया शांततापूर्ण, सुरळीत व पारदर्शक वातावरणात पार पडल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.