spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

आपत्कालीन कालाच्या ५० वर्षांनिमित्त BJYM नागपूरतर्फे मॉक पार्लमेंटचे आयोजन.

 

नागपूर 30 : भारतीय जनता युवा मोर्चा (BJYM) नागपूरतर्फे आज आपत्कालीन कालाच्या 50 वर्षांनिमित्त एक मॉक पार्लमेंट आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाचा उद्देश 1975 मध्ये काँग्रेस सरकारने लादलेल्या आपत्कालीन परिस्थितीची माहिती आजच्या पिढीपर्यंत पोहोचवणे हा होता.नागपूरमधील विविध महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभागी होत या सत्रात आपत्कालीन परिस्थितीवरील मुद्द्यांवर चर्चा केली. या कार्यक्रमाचे उद्घाटन भाजप नागपूरचे आदरणीय अध्यक्ष  दयाशंकर तिवारी आणि BJYM नागपूर अध्यक्ष  बादल राऊत यांच्या उपस्थितीत झाले. कार्यक्रमास BJYM प्रदेश महामंत्री शिवानी दाणी,प्रदेश सचिव  रितेश रहाटे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

कार्यक्रमाच्या संयोजक स्थानी भा.ज.यु.मो नागपुर महानगर महामंत्री अमेय विश्वरूप हे होते. या मॉक पार्लमेंटमध्ये एस. पी. सिंग आणि  विकास वैद्य यांनी न्यायाधीश म्हणून काम पाहिले, तर  राहुल क्रिष्णानी यांनी स्पीकरची भूमिका पार पाडली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डिंपी बजाज, निधी तेलगोटे आणी अमन पौणिकर, यांनी केले. आयोजन समिती मध्ये मनमीत पिल्लारे,वेदांत जोशी, प्रशंसा भोयर, अक्षय कडिखये,सुलभ देशपांडे,  तनय चौबे, ओजस खराळकर, अनुज तिवारी, दुर्गेश मानकर, कामाक्षा रेमके, अनुपम भगत, ऋग्वेद सेनाड तेजस जोशी, कार्यक्रमात अनेक मान्यवर उपस्थित होते, त्यामध्ये: श्रेयस कुंभारे, आशीष मोहिते, गुड्डू पांडे, नागेश साथवणे, आशीष मिश्रा, अक्षय ठवकर, कुलदीप माटे, अक्षय शर्मा, उदय मिश्रा, रितेश पांडे, मंगेश गोमासे, शशांक समुद्रे, अथर्व त्रिवेदी, केतन साठवणे. BJYM नागपूरतर्फे सर्व सहभागी, पाहुणे आणि सहकार्य करणाऱ्या टीमचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले

Popular Articles