पंकज परशुरामकर, प्रतिनिधी इनसाइडर न्युज टुडे
नवेगाव बांध :- भारतीय संविधानाने नागरिकांना मतदानाचा अधिकार दिला असून, प्रत्येक पात्र नागरिकाचे नाव मतदार यादीत अचूकपणे समाविष्ट होणे आवश्यक आहे. मतदार यादी तयार करण्याच्या प्रक्रियेत बूथ लेव्हल एजंटची (BLA) भूमिका अत्यंत महत्त्वाची असून, प्रत्येकाने आपली जबाबदारी योग्य पद्धतीने पार पाडावी, असे आवाहन माजी मंत्री तथा आमदार राजकुमार बडोले यांनी केले.
अर्जुनी-मोरगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने २३ ऑगस्ट रोजी कोकणाई सेलिब्रेशन सभागृहात बीएलए कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेत मार्गदर्शन करताना आ. बडोले बोलत होते.
आ. बडोले म्हणाले की, आजघडीला प्रत्येक पक्षाचा बीएलए घराघरापर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी पक्षाच्या माध्यमातून दिली जात आहे. मतदार यादीत सर्व पात्र मतदारांचा समावेश होण्यासाठी तसेच यादीतील त्रुटी दूर करण्यासाठी बीएलएने सजगपणे काम करणे गरजेचे आहे. मतदार यादीतील पारदर्शकता आणि अचूकता राखण्यासाठी बीएलएची भूमिका महत्त्वाची आहे.
कार्यशाळेत एसआयआर पद्धतीबाबत अनिल लाडे यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच बीएलएची जबाबदारी आणि बूथस्तरावरील कार्यपद्धती याबाबत दादा संग्रामे यांनी मार्गदर्शन केले. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते उत्कृष्ट काम करणाऱ्या बीएलएंचा सत्कार करण्यात आला.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रेमकुमार रहांगडाले, महिला जिल्हाध्यक्ष राजलक्ष्मी तुरकर, माजी जि.प. उपाध्यक्ष इंजि. यशवंत गणवीर, पंचायत समिती सभापती आत्रपाली डोंगरवार, तालुका अध्यक्ष लोकपाल गहाणे, नगराध्यक्ष मंजुषा बारसागडे, तालुका महिला अध्यक्ष सुनीला हुमरे, विधानसभा अध्यक्ष दादासंग्रामे, न.प. सभापती दानेश सारखे, नगरसेविका दीप्ती शहारे, पंचायत समिती सदस्य पुष्पमाला तुरकर, माजी जि.प. सदस्य रातीराम राणे, आर.के. जांभूळकर, राकेश लंजे, नारायण भेंडारकर, डॉ. दीपक राहिले, इंद्रजीत झिलपे, भोंजाराज रहले आदी उपस्थित होते.
कार्यशाळेचे संचालन किशोर तारोणे यांनी केले. तालुका महिला अध्यक्ष सुशीला हळमारे यांनी आभार मानले. कार्यशाळेला मोठ्या संख्येने बीएलए तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.





