कामठी २९ : स्थानिक सेठ केसरीमल पोरवाल महाविद्यालय, कामठी येथे २८ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी १०:३० वाजता स्व. राकेश कुमारजी पोरवाल स्मृती दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. विद्यापीठाच्या गीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली. सर्व मान्यवरांनी स्व. राकेश कुमारजी पोरवाल यांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य प्रा. डॉ. स्वप्नील दहत यांनी केले. ते म्हणाले की, स्व. राकेश कुमारजी पोरवाल यांनी शिक्षण क्षेत्रात मोठे योगदान दिले आहे, गरीब घटकातील विद्यार्थ्यांना शिक्षण मिळावे असे त्यांनी पाहिलेले स्वप्न आज पूर्ण होत आहे. प्लेसमेंट सेलच्या सौजन्याने प्रसिद्ध कंपनी टीसीएसमध्ये महाविद्यालयातील सात विद्यार्थ्यांची निवड होणे ही एक मोठी उपलब्धी त्यांनी मानली. सीईओ डॉ. सुधाकर धोंगडे यांनी शिक्षण प्रसारक मंडळ, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना महाविद्यालयाला उच्चांकावर ठेवण्यासाठी सतत कठोर परिश्रम करण्याचे आवाहन करतांना हीच राकेशजींना खरी श्रद्धांजली ठरेल असे मत व्यक्त केले. याप्रसंगी, डॉ. गिजाला हाश्मी यांनी संपादित केलेल्या केसरी वार्षिक अंक २०२४-२५, तसेच त्यांनीच लिहिलेले “द नॅचरल वर्ल्ड अँड द फेमिनाइन प्रिन्सिपल” आणि मराठी विभागप्रमुख डॉ. महेश जोगी यांनी संपादित केलेल्या “आधुनिक भारताच्या जडंगघडनीत महिलांचे योगदान” या ग्रंथांचे प्रकाशन करण्यात आले.
याप्रसंगी प्रमुख पाहुणे विनोद यशोदाबाई दयाराम जाधव, मुख्यधिकारी नगर परिषद कामठी म्हणाले की, पोरवल महाविद्यालय हे माझ्या पसंतीच्या निवडक महाविद्यालयांपैकी एक आहे. आमच्या विद्यार्थ्यांनी स्पर्धात्मक परीक्षांमध्ये यशस्वी होण्यासाठी समर्पण आणि दृढनिश्चयाने तयारी करावी. जेणेकरून त्यांची उच्च पदांसाठी निवड होईल. अध्यक्षीय भाषणात कामठीचे तहसीलदार आणि तालुका दंडाधिकारी श्री गणेश पुष्पा जयराम जगदाळे म्हणाले की, विदर्भातील विद्यार्थ्यांचा स्पर्धात्मक परीक्षांमध्ये यशाचा टक्का खूपच कमी असून स्पर्धात्मक परीक्षेत विद्यार्थ्यांचा यशाचा टक्का वाढावा म्हणून त्यांनी महाविद्यालयातच स्पर्धात्मक परीक्षेसाठी एक शाखा तयार करण्याचा सल्ला दिला. याप्रसंगी, स्व. राकेशकुमारजी पोरवाल स्मृती दिनानिमित्त राष्ट्रीय सेवा योजना युनिट आणि जीएसके रक्त पेढीच्या सौजन्याने एनएसएस अधिकारी डॉ. विनोद शेंडे आणि डॉ. निशिता अंबादे यांच्या नेतृत्वाखाली रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांसह एकूण ३० जणांनी रक्तदान केले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.
यावेळी विजय कुमारजी शर्मा, सचिव, शिक्षण प्रसारक मंडळ, माजी प्राचार्य डॉ. विनय चव्हाण, उपप्राचार्य डॉ. मनीष चक्रवर्ती, सीडीसी सदस्य वासुदेव बी. गुरनुले, आयक्यूएसीचे संयोजक डॉ. प्रशांत ढोंगले, ज्युनियर कॉलेजचे उपप्राचार्य सुधीर अग्रवाल, पर्यवेक्षक विश्वनाथ वंजारी, व्यवस्थापक स्वप्नील राठोड, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने कार्यक्रमाला उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा. डॉ. इफ्तेखार हुसेन, डॉ. दीपक भावसागर, डॉ. जितेंद्र सावजी तागडे, एनसीसी एनो प्रोफेसर लेफ्टनंट मोहम्मद असरार, एस.एस. माकडे, एस.पी. निंबाळकर, सुनील भालकर, प्रवीण अंबादे, सुनील राकडे यांनी विशेष योगदान दिले. कार्यक्रमाचे संचालन डॉ. गजाला हाश्मी व नीता वानखेडे यांनी केले तर आभार कार्यक्रम समन्वयक, उपप्राचार्य डॉ. रेणू तिवारी यांनी मानले