spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

फुटाळा तलावात आढळला अज्ञात व्यक्तीचा मृतदेह

नागपूर ७ :  ५ ऑगस्ट रोजी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास अंबाझरी पोलीस स्टेशन हद्दीतील फुटाळा तलावातील सार्वजनिक विसर्जन स्थळाजवळ एका व्यक्तीचा मृतदेह पाण्यात तरंगताना दिसला. स्थानिक नागरिकांच्या मदतीने मृतदेह तलावातून बाहेर काढण्यात आला. मृताचे वय ४० ते ४५ वर्षे असल्याचे सांगितले जात आहे, परंतु अद्याप त्याची ओळख पटलेली नाही. पोलिसांनी पुढील कारवाईसाठी मृतदेह मेयो रुग्णालयात पाठवला आहे. अंबाझरी पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Popular Articles