spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

नागपूर विमानतळावर बॉम्ब आणि स्फोटके ठेवल्याच्या धमकीच्या इ-मेलने खळबळ

 

नागपूर २२ : नागपुरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर बॉम्ब आणि सिगारेट पॉकेटांमध्ये स्फोटके ठेवल्याचा इ-मेल मंगळवारी सकाळी ८ च्या सुमारास विमानतळावरील वरिष्ठ अधिकाऱ्याला आल्याने एकच खळबळ उडाली. केंद्रीय सुरक्षा बल आणि नागपूर पोलिसांनी संयुक्त मोहीम राबवून विमानतळ आणि लगतच्या परिसराची तपासणी केली. तपासणी मोहीम दुपारी १२ पर्यंत सुमारे २ तास चालली. या तपासणीत काहीही आढळून आलेले नाही. अखेर मेल अफवा ठरल्याचे पुढे आले. विमानतळाची तपासणी सीआयएसएफचे वरिष्ठ अधिकारी आणि स्थानिक पोलिसांच्या मार्गदर्शनाखाली डॉग स्कॉड आणि बॉम्बशोधक पथकाने केली.

Source : Lokmat


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.