अवैधरित्या मोहाफुल गावठी दारु काढणा-या आरोपीतांवर ११ गुन्हे नोंद

0
193

नागपूर २२ : पोलीस स्टेशन जलालखेडा दिनांक २१/०७/२०२५ रोजी जलालखेडा पोलीसांना मौजा
उमठा, पारधी बेडा येथे अवैध्यरित्या मोहाफुल गावठी दारु काढणारे इसमाबाबत गोपनिय माहीती प्राप्त झाली. पोलीसांनी मौजा उमठा पारधी बेडा येथे जावुन कार्यवाही केली. अवैधरित्या मोहाफुल गावठी दारु काढणारे एकुण ०७ पुरूष आरोपी नामे १) प्रकाश माधवराव भोसले, वय ४५ वर्षे २) अजय शेरू भोसले, वय २७ वर्षे ३) बाबा सत्यम भोसले, वय ३३ वर्षे ४) राजेंद्र जर्नाधन पवार, ४९ वर्षे ५) गाना रोहील घोसले, वय २५ वर्षे ६) जिगर जगदिश पवार, वय २५ वर्षे ७) दिनेश रामचंद्र बनसरे वय ३५ वर्षे आणि ८ महिला आरोपीचे ताब्यातुन १) ४५५ लिटर मोहाफुल गावठी दारू कि. ३१,०००/- रुपये, २) १९९० लिटर मोहाफुल सडवा कि. ६९,६५०/- रुपये, ३) २० नग देशी दारू निप किंमती १४००/- रुपये आणि ४) एक मोटर सायकल असा एकुण १,४२,०५०/- रुपयाचा मुददेमाल मिळुन आल्याने नाशवंत मुद्देमाल मोक्यावर पंचनामा कार्यवाही करुन नाश करण्यात आला आहे. नमुद पुरूष आणि महिला आरोपी यांचे विरुध्द पोस्टे जलालखेडा येथे महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम अन्वये ११ गुन्हे दाखल करण्यात आले आहे.