रामटेक २२ ; दिनांक २०/०७/२०२५ चे २३:०० वा. ते दिनांक २१/०७/२०२५ चे ०५:०० वा. दरम्यान जिल्हा गस्त मध्ये रमेश बरकते, उपविभागिय पोलीस अधिकारी, रामटेक यांनी संपुर्ण जिल्हयात सतर्कपणे गस्त केली. पोलीस स्टेशन पारशिवणी अंतर्गत पारशिवणी टाउन आणि दहेगाव जोशी येथे पायदळ पेट्रोलींग करून कोबींग ऑपरेशन राबविण्यात आले आणि शिवाजी चौक येथे नाकाबंदी केली. तसेच रामटेक उपविभागात सर्व पोलीस स्टेशनला कोबिंग ऑपरेशन राबविण्यात आले. सदर कोबिंग ऑपरेशन रमेश बरकते यांच्या नेतृत्वात राबविण्यात आले असुन रेकॉर्डवरील गुन्हेगार, जेल रिलीज गुन्हेगार, निगराणी बदमाश तसेच अवैध दारू विक्रेते गुन्हेगार चेक करून त्यांचे घराची पंचासमक्ष घरझडती घेण्यात आली. हॉटेल लॉजेस चेक करण्यात आले. नाकाबंदी दरम्यान संशयीत वाहनांची तपासणी करण्यात आली. सदर कारवाईमध्ये स्थानिक पोलीस स्टेशन चे अधिकारी/अंमलदार यांच्या सोबत दंगा नियंत्रण पथक चे अंमलदार हजर होते.



