नागपूर :- कोल इंडिया रिटायर्ड ऑफिसर्स वेल्फेअर असोसिएशन, नागपूर (सिरोवा) ऑरेंज सिटी हॉस्पिटल, खामला यांच्या वतीने बोन मिनरल डेन्सिटी (BMD) तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या तपासणी शिबिराला सिरोवाच्या सदस्यांनी आपल्या पत्नींसह उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला. या उपक्रमाची संकल्पना हॉस्पिटलच्या चेअरपर्सन विद्या नायर व व्यवस्थापकीय संचालक डॉ. उषा नायर यांची होती. शिबिर यशस्वी करण्यासाठी ऑरेंज सिटी हॉस्पिटलच्या सर्व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. विशेषतः डॉ. प्रथमेश काणे, अस्थिरोगतज्ज्ञ डॉ. व्यंकटेश देशपांडे तसेच डॉ. प्रांजल काळे यांनी मोलाचे योगदान दिले. सिरोवाच्या वतीने एस.के.पुरी, अरुण हजारे, जे.एस.सायरे, व्ही.एस.कुलकर्णी तसेच सुधाकर दुबे यांनी शिबिराच्या नियोजन व आयोजनासाठी विशेष योगदान देऊन कार्यक्रम यशस्वी करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.
Home Latest News ऑरेंज सिटी हॉस्पिटल, खामला येथे सिरोवा सदस्यांसाठी बोन मिनरल डेन्सिटी तपासणी शिबिराचे...



