– JNIC मसाले उद्योगाच्या भव्य उद्घाटन सोहळ्याचे १२ जुलै रोजी आयोजन
नागपूर :- JNIC इंडस्ट्रीजच्या JNIC मसाले या नवीन उपक्रमाच्या भव्य उद्घाटन सोहळ्याचे आयोजन रविवारी १२ जुलै रोजी सायंकाळी ५ वाजता गडकरी वाडा, पहिला मजला, उपाध्येय रोड, महाल, नागपूर येथे करण्यात आले आहे. या उद्घाटन सोहळ्याला केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री ना. नितीन गडकरी, महसूल मंत्री तथा नागपूरचे पालकमंत्री ना. चंद्रशेखर बावनकुळे आणि आमदार ना. सुधीर मुनगंटीवार हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील. याप्रसंगी JNIC मसालेच्या माध्यमातून दर्जेदार, विश्वासार्ह व चविष्ट मसाल्यांचा नवा प्रवास सुरू होत असून, या सोहळ्यास नागरिक, व्यापारी, उद्योजक तसेच मान्यवरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजिका पूजा एन. यांनी केले आहे.




