spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

आजनी ग्रामपंचायतीची धुरा उपसरपंचाच्या खांद्यावर

कामठी :- कामठी तालुक्यातील आजनी येथे जून महिन्यात सरपंच संजय जीवतोडे यांनी मानसिक त्रस्त असल्या कारणावरून राजीनामा दिल्यानंतर पंचायत समितीच्या माध्यमातून राजीनामा मंजूर करण्यात आला होता. यानंतर गावाच्या विकासाच्या दृष्टीने आणि विद्यार्थ्यांना तसेच नागरिकांना विविध दाखले देण्यासाठी येणारी अडचण लक्षात घेता माजी आमदार देवराव रडके, सभापती उमेश भाऊ रडके, माजी जि.प. सदस्य भगवंतराव रडके, पोलिस पाटील बळवंतराव रडके, सचिव आतिश देशभ्रतार तसेच ग्राम पंचायतीचे सर्व सदस्यगण यांच्या सर्वानुमते शुक्रवार दिनांक १० जुलै रोजी ग्रामपंचातीचे उपसरपंच हेमराज दवंडे यांची प्रभारी म्हणून निवड करून गावाच्या विकासाची धुरा त्यांच्या खांद्यावर टाकण्यात आली.

गावाच्या विकासाच्या दृष्टीने मी सदैव प्रयत्नशील असेल. मात्र, यावेळी लोकांचा मला सहयोग मिळावा. असे हेमराज दवंडे यावेळी म्हणाले. उपस्थित ग्राम पंचायत सदस्य गणपत झलके, शंकर भोयर, हेमलता उकेबोंदरे, श्वेता चौधरी, अंकिता हेटे, कर्मचारी भीमराव नागोसे, नारायण वैद्य, योगेश नागापुरे, शुभम थेटमले, विक्की वाणी, राजू लायबर, प्रिया चिपडे, बिंदू गणवीर, सामाजिक कार्यकर्ते खुशाल विघे पहलवान, बळवंतराव नेऊलकर, बाबूराव धंदरे, दिवाकर घोडे, दिनेश बडगे, सुधाकर विघे, रवी मानकर, लीलाधर वाणी, दिनेश मेश्राम, प्यारेलाल चौधरी, माजी सरपंच प्रभाकर देशमुख, माजी सरपंच तुकाराम लायबर, कवडू चिंचुलकर, शेषराव जीवतोडे, निलेश मरसकोल्हे, गोपीचंद पाटील, जयराम चौधरी, वसंता भोयर, लक्ष्मण सलामे, इंद्रजीत वहिले, अशोक लायबर, उत्तम ढोक, सुरेश ढोक, राजेंद्र हेनकुळे, प्रकाश घोडे, आसू सोनटक्के, मधूकर राऊत लीला घोडे आणि हेमराज दवंडे यांनी यावेळी त्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला तसेच पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.