spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

पांढरा हत्ती ठरत असलेल्या केंद्रीय लिंबूवर्गीय फळ संशोधन संस्थेला शेतकऱ्यांच्या बांधावर आणा ! 

– विविध रोगांमुळे संत्रा झाडे वाळण्याच्या मार्गावर ! 

– राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आंदोलनाचा इशारा ! 

मोर्शी :- अमरावती जिल्ह्यामध्ये ५० हजार हेक्टर क्षेत्रावर विक्रमी संत्रा उत्पादन घेणाऱ्या मोर्शी वरूड तालुक्यातील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांच्या मागील संकटांची मालिका संपण्याचे नाव घेत नसून विविध रोगांमुळे मोर्शी वरूड तालुक्यातील संत्रा झाडे नामशेष होण्याच्या मार्गवर असताना सुद्धा केंद्रीय लिंबूवर्गीय फळ संशोधन संस्थेला शेतकऱ्यांच्या बांधावर येऊन संशोधन करायला तयार नसल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष रुपेश वाळके यांनी केंद्रीय लिंबूवर्गीय फळ संशोधन संस्थेला शेतकऱ्यांच्या बांधावर आणून संशोधन न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.

मोर्शी वरूड तालुक्यातील संत्रा पिकवणारा शेतकरी शासनाच्या उदासीन धोरणामुळे सलग आठव्या वर्षी मेटाकुटीला आला आहे. त्याच मुख्य कारण म्हणजे संत्रा भावगावरील विविध रोगांचे आक्रमण, संत्राबागांना लागलेली गळती. मागील दोन महिन्यांपासून अति पावसामुळे संत्रा उत्पादक शेतकरी हलाखीच्या परिस्थितीमध्ये सापडला असतांना हजारो संत्रा फळांनी बहरलेल्या संत्रा झाडावर मात्र आता निम्यापेक्षाही कमी संत्रा शिल्लक असल्याचे पहायला मिळत आहे.

मोर्शी वरूड तालुक्यातील शेतकरी विविध रोगांमुळे संत्रा झाडे वाळणे, संत्रा गळती यामुळे संकटात आला असून कोट्यावधी रुपयांचे नुकसान संत्रा उत्पादक शेतकऱ्यांचे झाले असतांना संत्रा उत्पादक शेतकऱ्यांवर आत्महत्या करण्याची वेळ आली आहे. याला केंद्रीय लिंबूवर्गीय फळ संशोधन संस्थेचे व कृषी विभागाचे उदासीन धोरण जबाबदार ठरत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष रुपेश वाळके यांनी केला आहे.

केंद्रीय लिंबूवर्गीय फळ संशोधन संस्था – सीसीआरआयने तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोचवण्यासाठी एक उत्प्रेरक (कॅटलिस्ट) म्हणून काम करायला पाहिजे. या संस्थेमधील उत्तम तंत्रज्ञान कृषी क्षेत्राच्या गुणात्मक वृद्धीसाठी कामी आलं पाहिजे. संस्थेन जगातील सर्वोत्कृष्ट पद्धतींचा अवलंब करण्यासाठी संस्थासोबत संयुक्त भागीदारी केली पाहिजे, केंद्रीय लिंबूवर्गीय फळ संशोधन संस्थेने शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन संशोधन केले पाहिजे, संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना ५० टक्के अनुदानावर बुरशीनाशके, कीटकनाशके, उपलब्ध करून देण्यात आले पाहिजे अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष रुपेश वाळके यांनी उप विभागीय कृषी अधिकारी उज्वल आगरकर, यांच्याकडे रेटून धरली असून पांढरा हत्ती ठरत असलेल्या केंद्रीय लिंबूवर्गीय फळ संशोधन संस्थेला ८ दिवसात शेतकऱ्यांच्या बांधावर न आणल्यास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष तथा ग्राम पंचायत सदस्य रुपेश वाळके यांच्या तर्फे आंदोलनाचा इशारा यावेळी देण्यात आला.

शासनाने संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना सोडले वाऱ्यावर !

अमरावती जिल्ह्यातील शेतकरी संत्रा गळतीमुळे हवालदिल झाला आहे. शेतकरी महागडी औषधे वापरत असला तरी याचा काहीएक फायदा होत नाही. परिणामी आर्थिक खर्चात वाढ आणि उत्पन्न कमी अशा अवस्थेत शेतकरी अडकला असतांना केंद्रिय फळ संशोधन संस्थेचे संशोधक व कृषी विभागाच्या तज्ञांकडून, शासनाकडून अजूनही ठोस उपाय योजना होतांना दिसत नसल्यामुळे सातत्याने होणारी संत्रा गळती ही संत्रा उत्पादक शेतकऱ्यांच्या मुळावर उठली आहे

Popular Articles