नागपूर :- महात्मा फुले यांनी 24 सप्टेंबर 1873 रोजी सामाजिक समता, बंधुता व न्यायासाठी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. तर याच दिवशी महात्मा गांधींनी बाबासाहेबांच्या माध्यमातून 1932 ला पुणेकरार केला. यातून राजकीय चमचे निर्माण झाले. त्याची झळ स्वतः बाबासाहेबांना सुद्धा बसली, त्यामुळे बसपाने सत्यशोधक समाज स्थापना दिन चे स्वागत करून पुणे कराराचा धिक्कार केला. हा स्वागत व धिक्कार समारोह आज संविधान चौकात पार पडला.
बसपाचे महाराष्ट्र प्रदेश मीडिया प्रभारी उत्तम शेवडे, नागपूर जिल्हा प्रभारी राजकुमार बोरकर, नागपूर जिल्हा महासचिव चंद्रशेखर कांबळे, उत्तर नागपूरचे पूर्व अध्यक्ष राजेश नंदेश्वर यांनी आज बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून हा दिवस साजरा केला.
याप्रसंगी प्रामुख्याने अंकित थूल, एड मुकेश मेश्राम, स्वप्निल ढवळे, मनोज गजभिये, शशिकांत मेश्राम, विकास नारायने, जनार्दन मेंढे, अविनाश गेडाम, आदेश रामटेके, विकास डोंगरे, कुणाल गजभिये, सुमित करवाडे, दिलीप लांडगे आदि प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.




