spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

Budget 2026 : ती एक घोषणा आणि शेअर बाजार पत्त्यासारखा कोसळला, सेन्सेक्स आणि निफ्टीत महाभूकंप, 16 लाख कोटी बुडाले

नवी दिल्ली :- केंद्रीय अर्थसंकल्पात केवळ एक घोषणा झाली आणि शेअर बाजारात मोठी घसरण झाली. शेअर बाजारात भूकंप आला. आज बजेटसाठी शेअर बाजाराचे विशेष सत्र आयोजित करण्यात आले होते. रविवारी सुद्धा शेअर बाजार सुरू होता. पण बाजार पत्त्यासारखा कोसळला.

केंद्रीय अर्थसंकल्पात आज रविवारी एक घोषणा झाली आणि शेअर बाजार हा पत्त्यासारखा कोसळला. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी F And O अंतर्गत STT करामध्ये वाढ केली. गेल्या बजेटमध्ये सुद्धा यात वाढ करण्यात आली होती. यावेळी यामध्ये 0.1 टक्क्यांची वाढ करण्यात आली. एसटीटी आता 0.15 टक्के करण्यात आला. त्यामुळे शेअर बाजारात महाभूकंप आला. सेन्सेक्स 2,400 अंकांनी आपटला. तर निफ्टी 700 अंकांनी चारही मुंड्या चित झाला. कॅपिटल सेक्टरमध्ये सर्वात मोठी घसरण दिसून आली. गुंतवणूकदारांचे व्यापारी सत्रात जवळपास 16 लाख कोटी रूपयांचे मोठे नुकसान झाले.

3 मोठी कारणं – बाजाराला का नाही आवडले बजेट

1. STT Tax करात मोठी वाढ

2. केंद्र सरकारने 12 लाख कोटीहून अधिक कर्ज घेण्याची चर्चा केली. ही बाब बाजाराला खटकली.

3. शेअर बाजारात गुंतवणूकदारांनी गुंतवणूक वाढवावी यासाठी कोणतीही नवीन घोषणा नाही

बाजारात महाभूकंप

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी नव्यांदा बजेट सादर केले. आर्थिक विकासाला गती देण्याची त्यांनी घोषणा केली. भारतीय शेअर बाजारात रविवारी, 1 फेब्रुवारी रोजी इंट्राडे व्यापारादरम्यान अचानक आणि तीव्र घसरण आली. अर्थमंत्र्यांनी एसटीटी, स्टेट टॅक्समध्ये वाढ करण्याची घोषणा केली. सेन्सेक्स व्यापारी सत्रात 2,400 अंकांची मोठी घसरण आली. निफ्टी 50 मध्ये जबरदस्त पडझड दिसली. व्यापारी सत्रादरम्यान निफ्टीमध्ये जवळपास 749 अंकांची घसरण दिसली. या घसरणीमुळे शेअर बाजारात गुंतवणूकदारांचे व्यापारी सत्रात जवळपास 16 लाख कोटी रूपयांचे मोठे नुकसान झाले.

बाजारा पत्त्यासारखा कोसळला

आकडेवारीनुसार मुंबई शेअर बाजाराचा प्रमुख निर्देशांक Sensex व्यापारी सत्रादरम्यान जवळपास 2,400 अंकांपर्यंत घसरला. व्यापारी सत्रात सेन्सेक्स 79,899.42 अंकांच्या निचांकावर पोहचला. तर सकाळी सेन्सेक्स 82,388.97 अंकावर उघडला होता. तर सुरुवातीच्या सत्रात 82,726.65 अंकांची उच्चांकी झेपही सेन्सेक्सने घेतली.

तर राष्ट्रीय शेअर बाजारात मोठी घसरण आली. आकडेवारीवर नजर टाकली असता निफ्टी 749 अंकांनी आपटला. त्यानंतर निफ्टी व्यापारी सत्रादरम्यान 24,571.75 अंकांसह निच्चांकावर पोहचला. सकाळी निफ्टी 25,333.75 अंकांवर उघडला होता. तर सकाळच्या व्यापारी सत्रात निफ्टी 25,440.90 अंकांच्या उच्चांकावर पोहचला होता.

बीएसईच्या टॉप 30 शेअर्समधील केवळ 3 शेअर तेजीत होते. तर 27 शेअरमध्ये मोठी घसरण झाली. सनफार्मा, टिसीएस आणि कोटक महिंद्रा वगळता इतर सर्व शेअरमध्ये 8 टक्क्यांची मोठी घसरण झाली. ऑटो, फार्मा आणि एफएमसीजी, बँक क्षेत्रासह इतर सर्व क्षेत्रात मोठी घसरण झाली. सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचे शेअर्ससुद्धा दबावात दिसून आले. आज शेअर बाजारात गुंतवणूकदारांचे 16 लाख कोटी रूपयांचे मोठे नुकसान झाले.

Popular Articles