spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

मातीच्या बैलांना साकारत तोंडली शाळेत बैलपोळा उत्साहात 

किशोर साहू, मौदा :- बैलपोळ्याच्या निमित्ताने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तोंडली येथे विद्यार्थ्यांसाठी मातीपासून बैल बनविण्याचा अभिनव उपक्रम राबविण्यात आला. विद्यार्थ्यांनी स्वतःच्या हाताने मातीपासून सुंदर बैल साकारत आपल्या कलागुणांना वाव दिला.

या उपक्रमात विद्यार्थ्यांनी बैलांसाठी चारा खाण्याची चौकट, गोठा, झूल तसेच विविध पारंपरिक सजावटीच्या वस्तू मातीच्या साहाय्याने तयार केल्या. या कृतीतून विद्यार्थ्यांना ग्रामीण जीवन, शेती आणि पशुधनाचे महत्त्व अनुभवातून समजले.

बैलपोळ्यानिमित्त विद्यार्थ्यांना वर्षभर शेतकऱ्यांसोबत कष्ट करणाऱ्या बैलांविषयी कृतज्ञता, माया, प्रेम आणि जिव्हाळा यांची जाणीव करून देण्यात आली. बैलांचे शेतीतील योगदान आणि त्यांच्या प्रती असलेली आपली जबाबदारी याविषयीही माहिती देण्यात आली.

मातीपासून बैल घडविताना विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलता, कल्पनाशक्ती, हस्तकौशल्य आणि सांस्कृतिक जाणिवांचा विकास झाला. पारंपरिक सणाचे महत्त्व कृतीतून समजून घेत विद्यार्थ्यांनी बैलपोळा उत्साहात साजरा केला.

या उपक्रमातून “मातीशी नाते, संस्कृतीशी नाते आणि कष्ट करणाऱ्या पशुधनाविषयी कृतज्ञता” हा सुंदर संदेश विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचला.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.