तिरोडा :- तिरोडा तालुक्यातील मुंडीकोटा बाजार चौक येथे प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुका अध्यक्ष प्रदीप निशाने यांच्या बेमुदत उपोषणाच्या दुसऱ्या दिवशी आज तिरोडा बस आगार व्यवस्थापक संजना पटले व तुमसर बस आगार प्रमुख कन्हैया भोगे यांनी आमरण उपोषणस्थळाला भेट देऊन बंद झालेल्या बस सेवा बाबत जी एक मागणी होती त्या मागणी करिता आज त्यांनी आश्वासन देऊन बस सुरू करण्यात येईल.
तुमसर एडमाकोटा केसलवाडा मार्ग तिरोडा तर दुसरी बस तिरोडामार्गे सरांनी बाई वाडा कोंबडा केसरवाडा नवेगाव कर्डी मार्गे भंडारा तर तिसरी बस होती तुमचं देवाढा मार्गे घोगरा घाटकोठा चांदोरी बिरोली मांडवी मुंडीबा मार्गे तिरोडा या फिर्या बरेच दिवसापासून बंद होत्या याबाबत बसची सुद्धा प्रमुख मागणी आमरण उपोषणामध्ये नमुद होती.
असे लिखीत पत्र दिले आहे. बेमुदत आमरण उपोषणाच्या ज्या14 मागण्या होत्या. त्यापैकी एक मागणी आज पूर्ण झाली.असुन कुठेतरी प्रहारच्या या आंदोलनाला काही प्रमाणात यश मिळाले असे म्हणायला हरकत नाही. हे बेमुदत आमरण उपोषण असे सुरू राहणार असुन मागण्या पूर्ण लढत राहणार असल्याचे उपोषणकर्ते प्रदीप निशाने प्रहार जनसक्ती पक्षाचे तालुकाध्यक्ष यांनी सांगितले आहे.




