यवतमाळ :- जिल्हा परिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ एकुण 62 जि.प.गटासाठी आरक्षण सोडत आज दि. १३ ऑक्टोबर रोजी जिल्हाधिकारी विकास मीना यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यवतमाळ जि.प.गटासाठी विभागीय आयुक्त अमरावती यांनी मान्यता दिलेले आरक्षण पुढीलप्रमाणे आहे. एकूण 62 जागांसाठी आरक्षण सोडत उत्साहात पार पडली. जिल्हा परिषद निवडणूक विभाग क्रमांक आरक्षण व महिला राखीव खालील प्रमाणे आहे.

जिल्हा परिषद निवडणूक विभाग क्रमांकानुसार बाभुळगांव तालुका निहाय नागरीकांचा मागासवर्ग प्रवर्ग 1 घारफळ, अनुसूचित जाती 2 सावर, कळंब तालुका निहाय नागरीकांचा मागासवर्ग प्रवर्ग 3 कोठा, अनुसूचित जमाती 4 नाझा,अनुसूचित जमाती 5 डोंगरखर्डा , राळेगांव तालुका निहाय नागरीकांचा मागासवर्ग प्रवर्ग 6 जळका, अनुसूचित जमाती महिला 7 झाडगांव, नागरीकांचा मागासवर्ग प्रवर्ग महिला 8 खैरी, मारेगांव तालुका निहाय नागरीकांचा मागासवर्ग प्रवर्ग महिला 9 कुंभा, अनुसूचित जमाती महिला 10 वेगाव, वणी तालुका निहाय सर्वसाधारण 11 राजुर, सर्वसाधारण 12 वेल्हाळा (वसाहत), सर्वसाधारण 13 तरोडा, नागरीकांचा मागासवर्ग प्रवर्ग 14 वागदरा, नागरीकांचा मागासवर्ग प्रवर्ग महिला 15 शिरपूर, झरीजामणी तालुका निहाय अनुसूचित जमाती महिला 16 माथार्जुन,सर्वसाधारण 17 मुकुटबन, केळापुर तालुका निहाय अनुसूचित जमाती महिला 18 मोहदा, अनुसूचित जमाती महिला 19 सायखेडा,अनुसूचित जमाती 20 पहापळ, अनुसूचित जमाती 21 पाटणबोरी, घाटंजी तालुका निहाय अनुसूचित जमाती 22 खापरी, अनुसूचित जमाती 23 पारवा, अनुसचित जमाती महिला 24 पार्डी न., यवतमाळ तालुका निहाय अनुसूचित जमाती 25 भारी, सर्वसाधारण महिला 26 आकपुरी, अनुसूचित जमाती महिला 27 अकोला बाजार, नागरीकांचा मागासवर्ग प्रवर्ग 28 रुई, नेर तालुका निहाय अनुसूचित जाती 29 पाथ्रड गोळे, सर्वसाधारण महिला 30 मागला देवी, सर्वसाधरण 31 बाणगांव, दारव्हा तालुका निहाय सर्वसाधरण 32 बोरी खुर्द, सर्वसाधरण महिला 33 लाडखेड, नागरीकांचा मागासवर्ग प्रवर्ग 34 लोही, सर्वसाधरण महिला 35 भांडेगांव, नागरीकांचा मागासवर्ग प्रवर्ग 36 महागांव क., आर्णी तालुका निहाय सर्वसाधरण महिला 37 जवळा, सर्वसाधरण महिला 38 बोरगांव दा., नागरीकांचा मागासवर्ग प्रवर्ग 39 सुकळी, सर्वसाधरण 40 सावळी स., दिग्रस तालुका निहाय नागरीकांचा मागासवर्ग प्रवर्ग महिला 41आरंभी-साखरा, सर्वसाधरण 42 कलगांव-डेहणी, सर्वसाधरण 43 हरसुल-सिंगद, पुसद तालुका निहाय सर्वसाधरण महिला 44 बान्सी, नागरीकांचा मागासवर्ग प्रवर्ग महिला 45 मधुकरनगर, सर्वसाधारण 46 जांबबाजार, सर्वसाधारण महिला 47 रोहडा, नागरीकांचा मागासवर्ग प्रवर्ग महिला 48 श्रीरामपूर, अनुसूचित जाती महिला 49 काकडदाती, सर्वसाधरण 50 शिळोणा, अनुसूचित जाती महिला 51 शेंबाळपिंप्रि, महागांव तालुका निहाय नागरीकांचा मागासवर्ग प्रवर्ग महिला 52 काळी दौ., सर्वसाधरण महिला 53 हिवरा, सर्वसाधरण महिला 54 गुंज, नागरीकांचा मागासवर्ग प्रवर्ग महिला 55 सवना, सर्वसाधरण 56 फुलसावंगी, उमरखेड तालुका निहाय सर्वसाधारण 57 निंगणूर, सर्वसाधरण महिला 58 बिटरगाव बु., अनुसूचित जाती 59 ब्राह्मणगांव, सर्वसाधारण 60 पोफाळी, अनुसूचित जाती महिला 61 मुळावा, अनुसूचित जाती महिला 62 विडूळ, या गटाचे आरक्षण सोडत पद्धतीने निश्चित करण्यात आले. यावेळी लोकप्रतिनिधी,पत्रकार, नागरिक, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.




